या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ मोरोपंतकृत स्यांतील सखीजवळ आपल्या नायकाचा वृत्तांत सांगत असतां तो ऐकून ‘सुंदरि कांत काय ? अशा रीतीने शंका घेतलेल्या दुस-या सखीस अनुलक्षून ‘कांत नव्हे पैजण' असे सांगून ख-या अर्थाचा निषेध केला आहे. (६) कैतवयुक्त अपन्हुति कपटादिपदीं गमे निषेध जरी । कांतासुकटाक्षमिषे निघती हे मदनबाण, भरति उरीं. ॥ ११ ॥ कपट, मिष, निमित्त, छल, इत्यादि शब्दांनीं वर्णनीयवस्तूचा निषेध केला असता ती कैतवापन्हुति होते. उदाहरणांत असत्यता वर्णन करणा-या ‘मिष' या शब्दावरून हे कांताकटाक्ष नव्हेत, तर मदनाचे बाण आहेत अशा रीतीने निषेध व्यक्त होत आहे (अलंकारविकाश). यांची उदाहरणे:-(शुद्धापन्हुति) न हे नभोमंडल, वारिराशी । न तारका, फेनचि हा तयासी । न चंद्र, हा वर्तुल शेष झाला । न अंक, तो विष्णु गमे निजेला.' ॥ १ ॥ (हेत्वपन्हुति) संताप दे यास्तव चंद्र नोहे । रवी ह्मणावा तरि रात्र आहे । हा सागरांतून निघून गेला । आकाशमार्गी वडवाझि ठेला.' ॥ २ ॥ (हेतुपर्यस्तापन्हुति) “लक्ष्मी खरे विष, हलाहल वीष नोहे । लोकांत मात्र उलटी समजूत आहे । कीं तें पिऊनिहि सुखें शिव जागताहे । विष्णू शिवूनिच हिला भुलि पावताह.' ॥ ३ ॥ ‘न विषं विषमित्याहुर्ब्रह्मस्वं विषमुच्यते । विषमेकाकिनं हन्ति ब्रह्मस्वं तु ससंततिम् ॥ ३ ॥ याचा अर्थः‘विष हे वीष नव्हे तर कर्ज हेच विष होय; विष एकट्याचाच प्राण घेते पण कर्ज मुलाबाळांसुद्धा काढणान्याचा प्राण हरण करिते.' (भ्रांतापन्हुति, कल्पित भ्रांति) 'जटा नोहे, वेणी; गरळ न गळां जें तुज दिसे, । असे कस्तूरी ही; शिरि कुसुम आहे, विधु नसे;॥ विभूती हे नोहे, तनुधवलता कांतविरहे; । शिवभ्रांतीने कां छळिसि मज कामा ! विफल हें.' ॥ ४ ॥ (छेकापन्हुति) ‘सीत्कार शिकवितो मज, अधरी व्रण करुनि पुलक उद्भवितो । नागरिक मिळाला कीं नोहे, हेमंतवासखये तो’ (सीत्कार=सू, सू, करणे) ॥ ५ ॥ छेकापन्हुतीचे एक सुरेख थोरले उदाहरण रामजोशाचे ‘राधासखिसंवादी छेकापन्हुति में आयका । रसिक हो काय चतुर बायका ।' हे पद होय. त्यांतील थोडासा मासला:-‘वांकड दिसे परि बहिरंतर निर्मला । ती काय राधिका ! नव्हे, इंदुची कळा । किति मंजु वसंती रसाळ जीचा गळा । ती काय राधिका ? नव्हे गड्या ! कोकिला.' ॥ रसज्ञांनी ते सर्व पद रामजोश्याच्या पदसंग्रहांत वाचावें. अपन्हुति’ अलंकाराचीं मोरोपंताच्या काव्यांतील थोडी उदाहरणेः-(१) पुत्र न ते, अतिदारुण खेळ तक्षकसर्प पाक-वणवेच.' (अनुशासन ८.३३), (२) ‘सखिहस्ती हस्त न वृष, पांडवहृदयांत सायका मारी। (क्रोधातें भीम गिळी, गरळातें जेंवि काय कामारी)' ॥ (सभापर्व) (३) ‘युद्ध न हरिसख मांडी त्या सद्यःस्वर्गहेतुसत्रास.' ।। (विराट अ० ५. ६६), (४) प्रतिरवमिषं शरांनीं भरतां, कुंथावयास नभ लागे.' ।। (विराट ५.३५), (५) ‘वृषसेना रणि ह्मणते नाथा ! तुज न विजयें न गुरुशापें । वधिले कृष्णाक्षोभे अथवा माझ्याचि पूर्वकृतपापे. । (स्त्री० ५.१०), (६) 3 सेंचि नाम दुसरें मायावती में धरी; । शत्रूच्या सदनीं न पाक, तप ती पत्याप्तिसाठीं करी. ॥ (७) शुकपिकसकलकलकलस्वरें करुनि भोंवतीच आरडती । विविधपतगति भूलता रडती. ॥ (कुशलवाख्यान ४.७७), (८) “सतु न तो, यत्पतिने स्वसुता नेली जशी व एणी । त्या लंकेची श्रीभूदेवीने ओढिली असे वेणा: । (वनपर्व १२. ११), (९) ते सत्य सध. न विशिख; कर्णहि न, तदीय सदन वारुळे तो; । कीं माणिक्यसर जयश्रीवरणीं शर गळां नवा