या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्धं राज्य दहापांच रुपयांचे नुकसान झाले तर माणसास कोण हळहळ वाटते ! पण ही झाली सामान्याची गोष्ट. असामान्याचे सर्वच कांहीं असामान्य असे जरी म्हटले तरी त्याला सुद्धां मर्यादा आहेच. दुसन्यासाठी पहिले जाणे, आणि पहिले गेल्यानंतर दुसरेही गमावणे यासारखे दुःख नाहीं. फर्धानाचा राजा म्हणून समाधान नाही तेव्हां समरकंद जिंकणे, समरकंद जिंकल्यानंतर फयोना वैच्यांनी काबीज करणे आणि तो पुन्हां काबीज करण्यासाठी समरकंद सोडतांच फर्घान्याचे राज्य नाहीसे होणे या घडामोडी पाहून मोठा अचंबा वाटतो. पण बाबुराच्या आयुष्यात असले प्रसंग त्याच्या पांचवीस पुजले होते. हा उलटलेला डाव माघारी फिरवण्याचा खटाटोप बाबुराने तत्काळ चालविला. निराश होणं है जरी स्वाभाविक असले तरी पण निराशेनें कायमची मरगळ घेणे हा त्याचा स्वभाव नव्हता. कांहीं काल त्याला वाईट वाटले. तो चिडखोर बनला. त्याचे स्वास्थ्य ढांसळले. तो ढसढसा रडला. पण अश्रूच्या रूपाने त्याची निराशा निचरून जातांच तो पुन्हां ताजा-तवाना झाला, आणि त्याचे प्रयत्न पुन्हा नव्या जोमाने चालू झाले. प्रथम त्याने आपल्या चुलत्याकडे-महंमदाकडे चाचपून पाहिले. कारण कर्घाना प्रान्त आपणाकडे असावा असे त्यास वाटत होते. या त्याच्या सुप्त