या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थिरस्थावर व व्यवस्था

काबूलच्या राज्यसीमेंत कोणकोणते प्रांत येतात, त्याची सरहद्द कोठे संपते, तेथे कोण लोक राहतात, त्यांच्या भाषा कोणत्या, रीतिरिवाज कोणते, धर्म कोणते ही महत्त्वाची माहिती सुद्धा त्याच्या दप्तरी दाखल होती. ही सर्व माहिती काढल्यानंतर त्याच्या मनाने असा सिद्धान्त काढला की, ज्या लोकांवर आपणांस राज्य करावयाचे आहे ते अत्यंत रानटी असून त्यांच्यावर वचक बसवायचा असेल तर सोडग्यासच हात घातला पाहिजे. समशेरीच्या चमकत्या पात्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत आणि सिध्या मार्गाने चालणार नाहीत. बाबुर आतां राजा झाला होता. त्याच्याजवळ फार मोठे सैन्य होते आणि ते सैन्य राजेपण कायम राखण्यासाठी अत्यंत जरुरीचे होते. हे सैन्य पोसण्यासाठी रयतेने धान्याच्या रूपाने कर द्यावा असे फर्मान बाबुराने काढिले. गैरशिस्तपणे वागण्यास सवकलेल्या बाबुराच्या रयतेस हे फर्मान मान्य झाले नाही. जरा गडबड झाली तेव्हां जबरदस्त मारपीट करून रयतेस शिस्तीचा धडा शिकविण्यांत आला. आपल्या सैन्याची नीट व्यवस्था कशी लावता येईल आणि त्याची शाक्त अखंड कशी ठेवता येईल हा विचार बाबुरास स्वस्थ बसू देत नव्हता. आता त्याला त्या म्हातारीने सांगितलेल्या हिंदुस्थानची आणि तैमूरच्या स्वान्यांची आठवण झाली. हिंदुस्थानचा संपात्त त्याच्या मनास आकर्षे लागली. आपण आपला मोर्चा हिंदुस्थानावर वळवावा असे त्यास वाटले व तो बाहेर पडला. त्याची ही भ्रमन्ति पांच महिनेपर्यंत चालली होती. इ. स. १५०५ जानेवारीपासून तो मे अखेर तो अनेक प्रांतांतून हिंडला, अफगाणिस्थान, खैबर, कोहट, बन्नू, बंगश, इसाकहैल, ब्रह्मपुत्रा आणि हिंदुस्थानच्या सरहद्दपर्यंत त्याने प्रवास केला. या प्रवासांत त्यास अनेक लोकांचे अनुभव आले व प्रदेशांची माहिती झाली. ह्या माहितीचा आणि अनुभवाचा उपयोग त्यास चांगलाच झाला. हा प्रवास करून तो माघारी आला तेव्हां त्यास असे समजले की, त्याचा भाऊ नसीर त्याला सोडून बदकशानकडे निघून गेला आहे. आतां त्याला जरा