या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काबूलचे कारस्थान ८५ तर मुळांतच कांटा निघाला असता. या राजकारणाची सूत्रे हलवणाच्या मुख्य व्यक्ति दोन. एक त्याची सावत्र आजी शाह बेगम व त्याचा मावसा महंमद् हुसेन मिझ दुघलत, ह्या दोघांचे हे राजकारण म्हणजे विश्वासघाताची पारसीमाच होय. कारण हिरातला जातांना बाबुराने आपला राज्यकारभार या मंडळीवर सोपविला होता, आणि त्यांनीच असा दावा साधला. हे राजकारण तडीस नेण्यासाठी काबूलच्या किल्लयाला चोवीस दिवसपर्यंत वेढा पडला. बाबुराच्या राजनिष्ठ लोकांनी त्याला चांगलेच तोंड दिले, पण इतक्यांत बाबुरच त्या ठिकाणी दाखल झाल्याने ह्या राजकारणाचे पेकाटच मोडलें. बाबुर काबुलास दाखल होतांच या राजकारणाचा धागा धागा मोकळा झाला. या वेळी बाबुराची वागणूक फार उदात्त आणि धीर-गंभीर होती. त्याच्या उमद्या स्वभावाची शोभा त्याच्या ह्या वागणुकीने आणखीच उठून दिसते. त्याला या राजकारणाची बित्तंबातमी लागली होती पण त्याने आपल्या चेह-यावर कोणत्याही तव्हेचा उद्वेग किंवा त्वेष दिसू दिला नाही. त्याच्या चेह-यावर पूर्वीचेच समाधान व आनंद दिसत होता. अशा स्थितीत तो प्रथम आपल्या आजीस-शाह बेगमसाहेबास भेटावयास गेला. आणि ही भेट इतक्या प्रेमाची वठली की खरोखरीच नितान्त वात्सल्याने एकुलत्या एक नातवंडाने आपल्या आजीस भेटावे, तिच्या प्रेमळ मांडीवर लोळण घ्यावी आणि पूर्ण समाधानाने गाढ झोपी जावे. आणि खरोखरीच बाबुर आपल्या प्रवासाचा शीणभाग दूर व्हावा म्हणून शाह बेगमच्या मांडीवर किंचित्काळ झोंपलाही. पण इतक्यांत त्याची मावशी मिहर निगर खानिम्-खान मिझची आई त्या ठिकाणी आली. इतक्या लांबचा प्रवास करून सुखरूप परत आल्याबद्दल तिने त्याचे अभिनंदन केले आणि १६ तुझ्या घरची मंडळी तुझी वाट पाहात आहेत तरी आपल्या राजवाड्यांत त्वरेनें जा; आम्हीही पण तेथे येत आणि त्या समारंभांत भाग घेतों असे त्यास सांगितले. मावशीच्या विनंतीस मान देऊन बाबुर आपल्या राजवाड्यांत गेला. तेथे तो पोहचतांच त्याच्या अमीर-उमरावांनी आणि सरदारांनी त्याचे स्वागत केले. मोठा जयजयकार केला. खान मिझ व महंमद हुसेन भिझ या प्रकाराने जागच्या जागी थिजून गेले आणि हे राजकारण पार विरले, नाहींसें झालें !