या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ बाबुर | फितुर त्या सैन्यांत माजला होता. समरकंदला सलाम ठोकून बाबुरास पळून जावे लागले. शहाचें साठ हजार सैन्य बाबुराच्या मदतीस आले. त्यांनी क्रौर्याचे किळसवाणे प्रकार चालविले. शेवटीं इ. स. १५१२ च्या नोव्हेंबरमध्ये धज दिवाण या ठिकाणी जोराची लढाई झाली. त्या वेळी कोनाकोप-याचा फायदा घेऊन सुनी नागरिकांनी बाणांची अशी प्रचंड वृष्टि केली की, शहाचे एवढे मोठे सैन्य पण त्याचा धुव्वा उडाला. बाबुराचे राज्य संपले आणि पुन्हां त्याची पुढील धडपड सुरू झाली,