ह्याचप्रमाणें बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेर संस्थानांत मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याबद्दल प्रयत्न केला. मक्त्याच्या मामलतीच्या योगानें, अंमलदार लोक, सरकारची व आपली तुंबडी भरण्याकरितां, प्रजेकडून जुलमानें वाटेल तसें द्रव्य काढितात. त्यामुळें प्रजा अगदीं जिकीरीस येऊन त्राणरहित होते. ह्या कारणास्तव तादृश फायद्याकडे लक्ष्य न देतां, प्रजेच्या हिताकडे लक्ष्य देऊन, ही चाल मोडून टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न दिवाण रावजी त्रिंबक ह्यांनीं सुरू केला. व त्याप्रमाणें त्यांनी दोन वर्षें अंमलवजावणी केली.१[१] त्या योगानें लवकरच ग्वाल्हेर संस्थानची प्रजा सुखी होऊन वसुलाची स्थिति सुधारेल, अशी आशा उत्पन्न झाली. परंतु दुर्दैवानें रावजी त्रिंबक हेच ता. २६ जानेवारी इ. स. १८३३ रोजीं मृत्यु पावले. त्यामुळें बायजाबाईसाहेबांचा उजवा हात मोडल्यासारखें होऊन त्यांस फार दुःख झालें. रावजी त्रिंबक हे प्रामाणिक व शहाणे
- ↑ १. रावजी त्रिंबक ह्यांनी ही मक्त्याच्या मामलतीची चाल बंद करून वसुलाची सुधारणा केली, अशाबद्दलचा उल्लेख त्यावेळच्या "Mofussil Ukhbar" नामक पत्रांत प्रसिद्ध झालेला आहे:-
"* * * * Raoji Trimbak, the minister, has, during the last two years, endeavoured to do away with the system of farming the land revenue; and though the immediate loss from the inefficiency or misconduct of the aumils would seem to have been considerable, yet as the system of amani management, under common superintendence, contains within itself the seeds of certain improvement to the country, we may, if it be preserved in, yet expect to see even the most distant districts assume a more flourishing aspect. It is a fine country, and under proper fiscal management, might be expected to yield a revenue of a million and a half of money."