पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/102

हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८

 विशेष []असे" असें वर्णन केलें आहे; एवढेंच नव्हे, तर खुद्द ग्वाल्हेर येथील रेसिडेंट व इतर युरोपियन लोक ह्यांनीही त्यांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली आहे. ता. १ जुलई इ. स. १८३२ ह्या तारखेच्या "इंडिया ग्याझेट" पत्रामध्यें "रीजंट बाई (बायजाबाईसाहेब ) ह्या संस्थानचा राज्यकारभार फार नियमितपणानें चालवीत आहेत. एवढेंच नव्हे, तर कै. महाराज दौलतराव ह्यांच्या कारकीर्दीपेक्षांही तो अधिक चांगल्या रीतीने चालला आहे"[] असा स्तुतिपर लेख प्रसिद्ध झालेला दृष्टीस पडतो. "ब्रिटिश हिंदुस्थानच्या इतिहासाचे" कर्ते मिल्लसाहेब ह्यांनी बायजाबाईंविषयीं असें मत दिले आहे कीं, "ती फार तेजस्वी व सत्वशील बायको असून, तिचें वर्तन सभ्य प्रकारचें होतें. तिच्या अंगांत राज्यकर्तृत्व कमी होतें असें नाहीं. तथापि तिच्याकडून आप्तस्वकीयांसंबंधानें अयोग्य पक्षपात क्वचित् घडून येई; आणि लोभाच्या भरात ती संस्थानाच्या कारखान्यांचे नुकसान करून खाजगी द्रव्यसंचय करण्यास उत्सुक असे. ती स्वभावानें कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती. तिच्या कारकीर्दीमध्यें ग्वाल्हेरचा राज्यकारभार, इतर कोणत्याही संस्थानाच्या बरोबरीनें असा, चांगल्या रीतीने चालला होता.[] मिल्लसाहेबांनी बायजाबाईसाहेबांचे गुण व दोष दोन्ही व्यक्त केले


  1.  १ रा. फडकेकृत शिंद्यांचा इतिहास.
  2.  २. "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of the late Maharaja."

    —India Gazette, 1st July 1832.

  3.  ३. "She was a woman of high spirit, and respectable conduct, not destitute of ability to govern, but disposed to the injudicious partiality to her own kin, and greedy in accumulating private wealth at the expense of public establishments. She was violent in temper, but not cruel or vindictive and during her administration the affairs of Gwalior were conducted with as much efficiency as those of any other native principality."

    -Mill's History. Page 292.