पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/129

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५



डेन्सीमध्यें येऊं दिलें, व सैन्याची कांहीं चलबिचल झाली नाहीं, तर त्यापासून जनकोजीराव ह्यांस फायदा होईल, असें मधाचे बोटही रेसिडेंटसाहेबांनीं लाविलें होतें. बायजाबाईंचें रेसिडेन्सीमध्यें जाणें ह्याचा अर्थ राज्यावरील आपला सर्व हक्क सोडून देणें, असाच महाराजांनीं समजावा, अशी रेसिडेंटसाहेबांनीं महाराजांजवळ ग्वाही भरली होती असें ह्मणतात. परंतु अशा बिकट प्रसंगीं देखील केवळ आत्मसंरक्षणाकरितां बायजाबाईंनीं रेसिडेंटांजवळ राज्याचा बेदावा कधींही लिहून दिला नसता, असें त्यावेळच्या एका माहितगाराचे मत आहे. अस्तु,

 बायजाबाई रेसिडेन्सीमध्यें आल्या व तेथें तंबूमध्यें येऊन राहिल्या. त्यांना कैद करण्याचा महाराजांच्या सैन्याचा निश्चय असल्यामुळें त्यानें ता. ११ रोजी पुनः बंड केले व रेसिडेन्सीवर हल्ला करण्याचा बेत केला. ह्या हल्यास भिऊन ह्मणा, किंवा लष्करी लोक हट्टास पेटले होते त्यांस संतुष्ट करण्याकरितां ह्मणा, किंवा कांहीं नाजूक राजकारणाच्या अंतस्थ उद्देशानें ह्मणा; परंतु मि. क्याव्हेंडिश ह्यांनीं सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, महाराज जनकोजीराव ह्यांस गादीवर बसविण्याचे त्यांस अभिवचन दिलें; आणि महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस ग्वाल्हेरीहून दूर पाठविण्याचें कबूल केलें. त्याप्रमाणें ता. १३ जुलई इ. स. १८३३ रोजी त्यांनीं महाराज जनकोजीराव ह्यांस


 1 "It is, however, asserted, and I can scarcely doubt the truth, that the Resident positively pledged himself to the Rajah, that he should consider the Rajah’s allowing her escape to the residency as a virtual resignation of her claims; but I can assure you from personal information, that the Baiza bai never would have yielded her claims even situated as she was for any promises of protection that the Resident could have offered." -

-India Gazette. November 13, 1833.