पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/131

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०७

समजणें फार कठीण आहे. तथापि, वामन पंडितांनीं ह्मटल्याप्रमाणें :-

श्लोक.

केव्हां सत्य वदे वदे अनृतही केव्हां वदे गोडही।
केव्हां अप्रियही दयालुहि असे केव्हां करी घातही ॥
जोडी अर्थहि जे यथेष्ट समयीं कीं वेंचही आदरी ।
ऐशी हे नृपनीति भासत असे वारांगनेचेपरी ॥ १ ॥

राजनीति ही चंचल व वारांगनेप्रमाणें बहुरूप धारण करणारी असल्यामुळें ती स्वार्थ साधण्याकरितां एकदम बदलली असल्यास त्यांत आश्चर्य मानण्याचेंही कारण नाहीं.[]


  1.  १. शिंद्यांच्या दरबारचे सर्जन डा. होप ह्यांनी ह्या प्रसंगी इंग्लिश राजनीतीचें धोरण दर्शविलें आहे, त्यावरून इंग्रज मुत्सद्यांच्या मनांत सुप्राप्त संधीचा कांहीं तरी चांगला फायदा करून घेऊन, मुंबईपासून आग्र्यापर्यंतचा प्रांत ब्रिटिश राज्यास जोडून टाकावा असा हेतु होता, असें ध्वनित होतें. ते लिहितात:-
     "* * * * Secret deliberations were there (in the Council of Calcutta ) being held, with a view to discover what profit could be made out of the troubles of this weak but most faithful young prince......A demi-official letter was written to the resident, by the Chief Secretary of the Foreign Department, desiring him to learn, at a private interview, by way of a feeler if the Maharaja, encircled as he was by serious troubles- troubles mainly caused by our Government- would like to resign; assigning over the country to the British Government, and receiving a handsome pension, which would be paid out of his own revenues. There can be very little doubt that this demi-official document was of the genus mystic, and that no copy of it can now be found among the archives pertaining to India. Mr. Cavendish, than no Englishman ever attained a greater ascendancy over the minds of the natives with whom he had concern, declined to make such a suggestion, and his answer