पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/139

हे पान प्रमाणित केलेले आहे.
११५

 मिसेस फेनी पाकर्स नामक एका आंग्ल युवतीनें बायजाबाईसाहेबांची ता. १२ एप्रिल इ. स. १८३५ रोजीं फत्तेगड येथें भेट घेतली. त्या भेटीच्या वर्णनांत त्यांच्या स्वरूपाबद्दल पुढें लिहिल्याप्रमाणे उल्लेख केला आहेः-_"महाराणीसाहेब ह्या भरगच्चीच्या गादीवर आपली नात गजराजासाहेब हिला घेऊन बसल्या होत्या. त्यांच्यासभोंवतीं त्यांच्या परिचारिका उभ्या होत्या; आणि शिंदे सरकारची तरवार त्यांच्या गादीवर त्यांच्या पायाजवळ ठेविली होती. आह्मी त्यांच्याजवळ जातांच, आमचा आदरसत्कार करण्याकरितां त्या उठून उभ्या राहिल्या, व आपल्यासन्निध त्यांनी आह्मांस जागा घेतली. बायजाबाईसाहेब ह्या बऱ्याच वृद्ध झाल्या असून त्यांचे केश शुभ्र झाले आहेत; व त्यांचे शरीर किंचित् स्थूल झालें आहे. त्या आपल्या तारुण्यामध्यें फारच सुंदर असल्या पाहिजेत. त्यांचें हास्य अतिशय मधुर असून त्यांचे बोलणेंचालणें विशेष चित्ताकर्षक आहे. त्यांचे हातपाय लहान असून, फार नाजूक व सुंदर आहेत. त्यांची मुखचर्या फार शांत आणि निष्कपट असून, त्यांच्या मुद्रेवर जें स्वातंत्र्य आणि जी प्रगल्भता दिसत होती, तिची मला फार प्रशंसा केल्यावाचून राहवत नाहीं. हे गुण अफू खाऊन सदैव सुस्त व निद्रावश झालेल्या मुसलमान स्त्रियांच्या चेहऱ्यावर मला दिसून आले नाहींत."[]


  1.  1. "We found her Highness Baiza Baie seated on her guddee of embroidered cloth with her grand-daughter the Gaja Rajah Sahib at her side; the ladies, her attendants, were standing around her; and the sword of Scindia was on the guddee, at her feet. She rose to receive and embrace us, and desired us to be seated near her. The Baiza Baie is rather an old woman, with grey hair and en bon point. She must have been pretty in her youth ; her smile is remarkably sweet, and her manners particularly pleasing; her hands and feet are small and beautifully formed......Her countenance is very mild and open; there is a freedom and independence in her air that I greatly admire, so unlike that of the sleeping, languid, opium-eating Mussalmanees."