पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/146

हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२२

हिंदु दरबारच्या चालीप्रमाणे त्यांनी बूट काढून आलें पाहिजे, असा आग्रह बाईसाहेबांच्या दरबारी मंडळीनें केला. परंतु लॉर्ड कोंबरमियर ह्यांचे दुभाष मेजर मेकन ह्यांनीं, "जे सन्मान आह्मी इंग्लंडच्या राजाच्या दरबारी अमलांत आणितों, तेच आह्मी येथे करूं. त्यापेक्षां अधिक उपचार आह्मी करणार नाही" असे उत्तर दिलें. हें उत्तर बायजाबाईसाहेबांस व त्यांच्या दरबारी मंडळीस रुचलें नाहीं. त्यांचें ह्मणणें असें पडलें कीं, "भिन्न भिन्न देशांत सन्मानाच्या रीति वेगवेगळ्या आहेत. तेव्हां आमच्या दरबारांत ज्या असतील त्या तुह्मीं पाळल्या पाहिजेत." परंतु ही गोष्ट लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या पक्षानें मान्य केली नाहीं. अखेर होय नाहीं करितां करितां, दरबारचा समारंभ व भेटी वगैरे झाल्या. ह्या दरबारामध्यें बायजाबाईसाहेबांनी सर्व युरोपियन लोकांस बुटांसह येऊ दिले. परंतु आपल्या चालीप्रमाणें दरबारामध्यें खुर्च्या न मांडितां, रुजाम्यावर गालिचे घालून, मराठी तऱ्हेची बिछायत मांडली. त्यामुळे तंग विजारी घातलेल्या ह्या आंग्ल वीरांस तिच्यावर बसणें फार कठीण पडेले[]. ह्यामुळें जो प्रकार घडला तो वर्णन करणे कठीण आहे !! तात्पर्य, बायजाबाईसाहेबांच्या स्वाभिमानामुळें व उपचारप्रियतेमुळें ग्वाल्हेर येथें त्या कालीं अशा गोष्टीं वारंवार घडत असत.


  1.  १ ह्या गोष्टीचा उल्लेख लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या चरित्रांत देखील आलेला आहे. तो येणेप्रमाणे :-
     "The neighbourhood of this city was reached on the 2nd of January, 1829, when a halt took place for the purpose of settling the etiquette to be observed on this occasion. There were great difficulties in the way of coming to an arrangement, for the capital had never before been visited by a personage of such high rank as Lord Combermere. All the artifices of