पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/148

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२४



असावयाचें सोडून, आपल्यासमक्ष खुर्चीवर बसले, हें त्यांस पसंत पडलें नाही. त्यांनी लगेच तीच खुर्ची त्यांच्या डोक्यावर आपटण्याचा हुकूम दिला ! ही गोष्ट एका एस्कॉर्ट ऑफिसरनें लिहिली आहे.

राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा.

 बायजाबाईसाहेबांच्या ठिकाणीं राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा हा गुण पूर्णपणें वसत असे. ह्या गुणाची उणीव मोठमोठ्या राजांमध्यें देखील असते, परंतु ती ह्या राजस्त्रीच्या ठिकाणीं बिलकूल नव्हती. ह्या गुणावरून ह्या स्त्रीचे बुद्धिवैभव व स्वाभाविक शहाणपण हें दिसून येतें. ह्याच विशिष्ट गुणामुळें ही स्त्री राज्यकारभार वाहण्यास पूर्णपणे पात्र व समर्थ झाली होती. हिच्या राजकारणचातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं ग्वाल्हेर दरबारचे पूर्ण माहितगार युरोपियन गृहस्थ डा. होप ह्यांनी जी गोष्ट आपल्या पुस्तकांत दिली आहे, ती येथें सादर करण्यासारखी आहे. ती येणेंप्रमाणें :-

 "[]ह्या स्त्रीच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना, ब्रह्मी


  1.  1. "It was during the regency of this lady that our wars with the Burmese and the usurper of Bhurtpoor took place— wars which cleared the treasury of Calcutta of the immense surplus cash which the frugal administration of the Marquis of Hastings had amassed. To get money somewhere and somehow was a necessity which the Governor-General, Lord Amherst, felt, admitted of no delay. The king of Oude could not be applied to again. He had lent a few millions five or six, and had been paid off with a strip of territory taken from Nepaul, 'Suppose' said a Calcutta magnate, 'we try what Scindea will do. The Mahrattas are a singularly penurious race, and the coffers of their chief are believed to be well filled with rupees-two or may be three crores buried in the palace; and who can say that the Baiza Bye would be indif-