पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/154

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३०

 साहेबांच्या हातून राज्यकारभार जाऊन त्यांस स्थलांतर करावें लागलें, त्या वेळीं हे त्यांच्याबरोबर गेले होते. पुढें फत्तेगड येथून इ. स. १८३५ मध्यें बायजाबाईसाहेबांस अलहाबादेस आणिल्यानंतर, ह्यांस इंग्रज सरकाराने पेनशन करून दिल्लीस ठेविलें. दिल्ली येथे हिंदुराव बाबांचा वाडा प्रसिद्ध असून त्यांची युरोपियन लोकांत विशेष चाहा असे. हिंदुराव बाबा रूपाने बायजाबाईंसारखे सुंदर नव्हते. त्यांची एक मोठी तसबीर दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्यें ठेविलेली आहे; तिच्यावरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना करितां येते. ‘कलकत्ता रिव्ह्यू' मधील एका लेखकानें असें लिहिलें आहे कीं, "[]मालकम साहेबांनीं कृष्णाकुमारीच्या सौंदर्याची कल्पना तिच्या भावाच्या सुस्वरूप मुद्रेवरून बसविली आहे. त्याप्रमाणें पाहूं जातां, दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्यें असलेल्या हिंदुरावांच्या तसबिरीवरून बायजाबाईंचें स्वरूप मोठें सुंदर होतें असे मानितां येत नाही. त्या तसबिरीवरून, हिंदुरावांचे नेत्र तेवढे पाणीदार असून, त्यांचें शरीर कृष्णवर्ण व स्थूल असावें असे दिसून येतें." परंतु बायजाबाईसाहेबांसंबंधानें हें अनुमान चुकीचें आहे. हिंदुराव जरी विशेष सुस्वरूप नव्हते, तरी बायजाबाईसाहेब ह्या सुस्वरूप होत्या, ह्याबद्दल मुळींच शंका नाहीं. हिंदुराव बाबांबद्दल क्याप्टन मुंडी व मेजर आर्चर ह्या दोन


  1.  1. "If Malcolm inferred Kishen Komari to have been beautiful from the comely features of her brother, one may conclude Baiza Baiee to have had little pretensions to a good physiognomy, judging from the portrait of her brother, which hangs on the walls of the Delhi museum. In that portrait, Hindoo Rao appears to have been a stout gentleman of the regular swarthy colour, but with a pair of very animated eyes."- Calcutta Review.