पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/161

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३७

 अशा प्रकारें हाल अपेष्टा बायजाबाईसाहेबांस फारच सहन कराव्या लागल्या; एवढेंच नव्हे, तर त्यांच्या काशी येथील राजवाड्यांतून ३७।। लक्ष रुपये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनें जप्त केले व इंग्रजी खजिन्यांत नेऊन सुरक्षित ठेविले![] अशा रीतीनें त्यांस इंग्रज अधिकाऱ्यांनीं अप्रेमभावाने वागविलें. ह्या कष्टमय स्थितीबद्दल त्यांनी हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल ह्यांस वेळोवेळी अर्ज पाठविले; व दुःखाने संतप्त होऊन, पुष्कळ झणझणित शब्दांनीं त्यांच्या हृदयास द्रव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांस ह्या राजस्त्रीबद्दल दया आल्याचें दिसत नाहीं. एका अर्जामध्यें त्यांनी खुद्द गव्हरनरजनरलसाहेबांस असें लिहिलें होतें कीं, "लॉर्डसाहेब, आपण माझे संरक्षक असतांना मला अशा प्रकारच्या विपत्तियातना भोगाव्या लागल्या आहेत, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. ह्याबद्दल इतकेंच मानणें भाग पडतें कीं,


  1.  १. काशी येथील बायजाबाईसाहेबांचा खजिना जप्त केल्याचा उल्लेख मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी केला आहे. ह्या बाई काशी येथील बायजाबाईसाहेबांचा वाडा पाहण्याकरितां गेल्या होत्या. ज्या वेळीं त्यांनी त्यांच्या खजिन्याच्या पेट्या पाहिल्या त्या वेळीं त्यांस त्यांतील अठरा हजार मोहरा कंपनी सरकाराने नेल्या असें समजून आले. त्या लिहितात ;-
     "The Mahratta, who did the honours on the part of her Highness, took me into one of the rooms, and showed me the two chests of cast-iron, which formerly contained about eighteen thousand gold mohurs. The government took that money from the Bai by force, and put it into their treasury. Her Highness refused to give up the keys, and also refused her sanction to the removal of the money from her house; the locks of the iron chests were driven in, and the tops broken open; the rupees were in bags in the room; the total of the money removed amounted to thirty-seven lakhs."-Page 63.