पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

आपला शौर्यवैभवाचा कळस करून सोडला. थोरले माधवराव पेशवे ह्यांनीं, जयाप्पाचे पुत्र जनकोजी शिंदे ह्यांजकडे जी सरदारी व जो सरंजाम होता, तो त्यांच्या पश्चात् पाटीलबावांस छ० २९ जमादिलावल सुहुर सन आर्बा सितैन ह्या सालीं दिला. त्या दिवसापासून छ० ३० रजब आर्बा तिसैने पर्यंत, महादजी शिंदे ह्यांनी शुक्लेंदूप्रमाणे आपल्या भाग्यचंद्राची वृद्धि केली; व त्याच्या प्रकाशानें मराठ्यांचा शौर्यमहिमा


 १ ता० ५ दिसेंबर इ. स. १७६३ रोज सोमवार.

 २ ता० ३ मार्च इ. स. १७९४ रोज सोमवार.

 ३ महादजी शिंदे ह्यांनी उत्तर हिंदुस्थानांतल्या स्वाऱ्यांमध्ये क्रोडो रुपयांचा प्रांत जिंकून घेतला; त्याचप्रमाणे संपत्तिहि पुष्कळ मिळविली. ह्या संपत्तीची एक यादी पुढे लिहिल्याप्रमाणें आहे. ती पाहिली असतां शिंद्यांचे वैभव केवळ पराक्रमाच्या जोरावर कसे वाढलें ह्याची कल्पना करितां येईल:-

याद पाटील यांणीं हिंदुस्थानांतून घेतले बितपशील:-
नगदजिन्नस व जवाहीर वगैरे.  तोफा.
राणा गोहदकर याची जप्ती ३२०००००  
मामलत मिर्जा शफीखां ३३०००००  
जप्ती अफरासियाबखां ४००००००  ५७०
शुजाऊतदीलखां व वजीर अफरासियाब खानाचे सासरे व जहांगीरखां त्याचा भाऊ ४०००००  
राजे नारायणदास अफरासियाब खानाचा दिवान ३०००००  
महमदबेगखां हमदानी याची जप्ती ६०००००  ८०
रणजीतसिंग जाट याची मामलत १२०००००  
मामलत राजे जयनगरकर दोन वेळ ८५०००००  
मामलत पिटाला ( पतियाला ) ६०००००