पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/37

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४

अखंड प्रज्वलित केला. ह्यांच्या कारकीर्दीचा वृत्तांत हा स्वतंत्र इतिहासाचा भाग असल्यामुळे तो येथें दाखल करणे अप्रासंगिक आहे. तथापि, एवढें सांगणें जरूर आहे कीं, सांप्रत पाटीलबावांच्या चरित्राची जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यापेक्षाही अधिक कागदपत्र जेव्हां प्रसिद्ध होतील, तेव्हां ह्या थोर पुरुषाचें चरित्र फारच विचारार्ह व गंभीर आहे असें दृष्टीस पडेल. "नाना व महादजी" ह्या उभय मुत्सद्यांच्या गुणावगुणांचें सामान्य परीक्षण होऊन महादजीविषयीं जो लोकग्रह बनला आहे, तो बराच एकतर्फी व असत्य आहे, असेही मानण्याचा


    नगदजिन्नस व जवाहीर वगैरे. तोफा.
    मामलत दतिया व बधावर वगैरे ८०००००
    मामलत रामरतन मोदी पादशाही व लालजीमल ३०००००
    मामलत रावराजे प्रतापसिंग माचाडीवाले ४०००००
    गुलाम कादरखां याची जप्ती ६०००००० ८०
    दरोवस्त पातशाही वस्तभाव माल नगद व जिन्नस व जवाहीर वगैरे नेलें तें पाटीलबावाकडे आलें.
    पाटणच्या लढाईत इस्माईलबेगखां व राठोर यांणीं शिकस्त खाल्ली. ८०
    ____________ ________
    २९६००००० ८१५

     पातशाह व नजफखां व गोहदवाले वगैरे यांचा मुलूक तसरुफांत आहे:-

    मुलुक पातशाही व नजफखां व गुलाम कादर वगैरे २२५०००००
    गोहदकर राणा याचा मुलूक ४२०००००
    मुलूक वधावर व कछवा व भांडेर वगैरे १८०००००
    __________
    २८५०००००

      दोन करोड पंच्याऐशी लक्ष रुपये साल तमाम. यांत कमज्यादा तहकिकातीच्या अन्वये शिबंदी खर्च वगैरे.