पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२

ऐकून किंचित् स्मित केले, व त्यांस उत्तर केलें कीं, "माझ्याजवळ एवढी प्रचंड पायदळ फौज व भरभक्कम तोफखाना असतांना, माझ्याशीं कोण टक्कर देणार आहे?" त्या वेळी ह्या वयोवृद्ध सरदारानें उत्तर दिलें कीं, "हीच पायदळ फौज व ह्याच तोफा तुमच्या नाशास कारण होतील!" तीच गोष्ट पुढे अक्षरशः अनुभवास आली. असो.

 दौलतराव शिंदे ह्यांनीं माळव्यांत गेल्यानंतर उज्जनी वगैरे प्रांत होळकराच्या ताब्यांतून परत घेऊन, उज्जनी येथे आपली राजधानी केली. उज्जनी येथे यशवंतराव होळकरांनीं लूटमार करून शिंद्यांच्या प्रजेस फार त्रास दिला होता. त्याबद्दल त्यांचा सूड घेण्याकरितां दौलतराव शिंदे ह्यांचे कारभारी सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदुरावर चाल केली; व इंदूर गांव लुटून उध्वस्त केला. अशा रीतीनें आपसाआपसामध्यें कलह चालले. इकडे पुणें दरबारची स्थिति अत्यंत शोचनीय होत चालली. बाजीराव पेशवे ह्यांनी यशवंतराव होळकरांचा बंधु विठोजी ह्यास हत्तीच्या पायीं देऊन ठार मारल्यामुळे ते संतप्त होऊन पुण्यावर


 १ मराठ्यांनी आपली पूर्वीची युद्धपद्धति सोडून पाश्चिमात्य पद्धति स्वीकारली ३ ह्मणूनच त्यांचा नाश झाला, असे उद्गार मोठमोठ्या युरोपियन मुत्सद्यांनींही काढिले आहेत. सर फिलिफ फ्रान्सिस ह्यांनी पार्लमेंटमध्यें बोलतांना एकदा असे उद्गार काढिले कीं:-

 "Sir, the danger you allude to, in the progress the Marathas are making in the art of casting cannon, in the use and practice of artillery, and in the discipline of their armies is imaginary. The Marathas can never be formidable to us in the field on the principles of an European army. They are pursuing a scheme in which they can never succeed, and by doing so they detach themselves from their own plan of warfare, on which alone, if they acted wisely, they would place dependence."

 प्रसिद्ध सेनानी डयूक ऑफ वेलिंग्टन ह्यांचेही असेच मत होते