पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

शोकाकुल होऊन गेले होते; व त्यांच्या नेत्रांतून एकसारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. त्यावरून महाराजांविषयीं त्यांची किती प्रीति होती ह्याची साक्ष पटत होती. दौलतराव शिंदे हे चांगल्या राजास लागणाच्या सर्व गुणांनीं जरी परिपूर्ण नव्हते, तथापि ते दुष्ट किंवा क्रूरकर्म करणाच्या राजमालिकेंत गणले जाणारे नव्हते. त्यांच्या ठिकाणीं शहाणपण किवा समजूत ह्यांची उणीव नव्हती. ह्मणूनच महाराष्ट्रसाम्राज्यरूपी नौकेचा भंग झाला असतांना त्यांचे संस्थान सुरक्षित राहिलें. ते फार शूर व रसिक होते. अनेक भाषणप्रसंगीं ते ज्या उपमा आणि जे दृष्टांत देत असत, ते फार मार्मिक व आनंदप्रद असत. त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य व शांत होता. तारुण्यावस्थेंत त्यांचे दुर्गुण व प्रमाद कितीही असले (आणि त्याबद्दलचा सर्व दोष महाराजांपेक्षा त्यांच्या कुटिल मंत्रिमंडळाकडे अधिक येतो असें मला वाटते. ), तथापि त्यांच्या पुढील कारकीर्दींत, त्यांच्या हातून नीतीचा मोठासा भंग होण्यासारखी एकही गोष्ट घडली नाहीं. दुर्लक्ष्य व आळस हे त्यांचे दोन मोठे दुर्गुण होते. ते त्यांस राजपदाची कर्तव्यकर्में उत्तम रीतीने बजावण्यास सदैव आड येत असत. एकंदरीत, हिंदुस्थानांतील एवढी मोठी विस्तृत सत्ता त्यांचे हातीं अवघे चौदा वर्षांचें अल्प वय असतां आली; व त्यांचे सर्व बालपण, त्या काळच्या मराठी लष्कराचें लक्षण होऊन राहिलेल्या 'विश्वासघात' व 'लुटालूट' ह्यांच्या देखाव्यांत गेले; ह्या दोन गोष्टी लक्ष्यात घेतल्या, ह्मणजे त्यांच्या कारकीर्दींत घडलेल्या पुष्कळ चुका व दोष हे क्षम्य होते, असें मानण्यास हरकत नाहीं. ह्या पत्रांतील कांहीं भाग नेहमींच्या सरकारी पत्रव्यवहाराच्या मर्यादेपेक्षां अधिक लिहिला गेला आहे; तथापि ह्या प्रसंगाचें महत्त्वच तसें आहे असे समजून, त्याबद्दल क्षमा होईल अशी आशा आहे. ज्या संस्थानिकाचा व माझा पुष्कळ दिवसांचा परिचय आहे, व ज्याचें वर्तन अलीकडे मज