पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४

त्या पदार्थात जिरतो, कांहीं नियमित रीतीनें परावर्तन पा वतो, आणि कांहीं अनियमित रीतीनें परावर्तन पावतो.
 अंधाऱ्या खोलीच्या खिडकीला भोंक पाडून त्यांतून एक सूर्यकिरण आंत घ्यावा आणि त्या किरणाखालीं जमिनीवर एक आरसा ठेवावा. ह्मणजे त्याचा कौडसा पलीकडच्या भिंतीवर पडतो. आणि खोलीतली धूळ इकडे तिकडे उडत असते, तिच्या योगानें त्या भोंकांतून येणाऱ्या किरणाचा मार्ग व कौडशाच्या किरणाचा मार्ग चांगला दिसतो. आतां, त्या आरशावर ज्या जागीं किरण पडलेला असतो, त्या जागी जर एक काठी अगदीं सरळ उभी धरली, तर त्या दोन्ही किरणांनीं त्या काठीबरोबर होत असलेले कोन परस्परांशीं बरोबर आहेत असें दिसेल. ज्या परावर्तनांत हे दोन्ही कोन परस्परांशी बरोबर असतात त्याला नियमित परावर्तन ह्मणतात. आरसा चांगला जिल्हई दिलेला असला तर, या नियमित परावर्तनाच्या योगानें, आपल्या डोळ्यांस आ रसा दिसत नाहीं, परंतु त्यांत सूर्याची, किंवा, किरण दि व्याचे असल्यास त्या दिव्याची, प्रतिमा दिसते. अनियमित परावर्तनांत वर सांगितलेले कोन बरोबर असावे लागत नाहींत. त्यांत, पदार्थावर पडलेला प्रकाश चोहींकडे प रावर्तन पावतो. त्याच्या योगानें सूर्याची किंवा दिव्याची प्रतिमा दिसत नाहीं; परंतु ज्यावर तो प्रकाश पडलेला असतो, त्याची प्रतिमा दिसते. उदाहरणार्थ, एकादें फूल जर त्या किरणांत धरलें, तर सूर्याची प्रतिमा दिसणार नाहीं, तें फूलच दिसेल.
 ह्यावरून आरशाची व्याख्या समजणे सोपें पडेल. ज्या वस्तूच्या पृष्ठभागावर किरणांचें नियमित परावर्तन होऊन