पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७

तिमा दिसतात. आणि तो जसजसा जास्त कलता करून मधला कोन कमी करावा, तसतशी त्या प्रतिमांची संख्या वाढत जाते.
 ह्या धर्माच्या अनुरोधानें एक गमतीचा खेळ करितां येतो. निरुंद व लांब असे एका बाजूनें पारा लावलेले कांचेचे सारखे तीन तुकडे घेऊन, ते, त्यांच्या पारा न लाविलेल्या बाजू एकमेकींकडे करून एका जस्ताच्या लांब नळींत बसवावे. मग त्या नळीच्या एका तोंडावर कांचेचें एक झांकण बसवावें, आणि तींत कांचेचे रंगीबेरंगी वेडे- वांकडे तुकडे टाकावे. आणि मग ते तुकडे सगळ्या न ळीभर पसरूं नयेत ह्मणून त्यांवर दुसरी एक कांच बस- वावी. नंतर त्या नळीच्या दुसऱ्या तोंडावर जस्ताच्या प व्याचें एक झांकण बसवावें. त्या झांकणास मध्यभागीं एक छिद्र असावें. आणखी मग ती नळी उजेडाच्या स मोर धरून त्या छिद्रांतून पाहावें; ह्मणजे चित्रविचित्र फुलांचा भास होतो. ते आरसे परस्परांशीं कलते अस ल्याच्या योगानें त्या तुकड्यांचीं अनेक प्रतिबिंवें दृष्टीस पडतात, आणि मागें फूल आहे असे वाटतें. आणि ती नळी जसजशी हालवावी तसतशी त्या तुकड्यांच्या जागा बदलून नवीन अगणित प्रकारची फुलें दृष्टीस पडतात.
 परावर्तन झालेले सूर्याचे किरण किती लांबून दिसतात, तें पुष्कळांनी पाहिलेंच आहे. चांदबिबीचा महाल अह- मदनगरापासून तीन कोस दूर आहे. तरी, ऊन पडलें असलें ह्मणजे त्याच्या खिडक्यांचीं तावदानें नगराजवळून दिसतात. ह्या धर्माचा उपयोग लढाईच्या वेळी पुष्कळ करून घेतात. शत्रूच्या मुलुखांत वीस वीस पंचवीस