पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ इतकें कीं, ज्यांनी इंग्रजी शाळात एक एक तप घालविलें आहे, त्यांच्यांत आणि ह्यांच्यांत कांहीं अंतर दिसत नाहीं. ह्यांची मुलकी खात्यांतील परीक्षा इ० स० १८४६ सालीं उतरली. मग लागलीच त्यांस धुळ्यास कलेक्टर आफि- सांत कारकुनीची जागा मिळाली. त्या जागेचें काम त्यांनी सुमारें चार वर्षे केलें. नंतर त्या जागेचा राजीनामा देऊन त्यांचे बंधु शामराव रामचंद्र ह्यांस ते व्यापाराचे कामीं साह्य करूं लागले. पुढें, रावबहादुर मोरोबा कान्होबा धुळें एथें प्रिन्सिपाल सदर अमीन असतां त्यांचे जवळ कायदा शिकून ह्यांनीं इ० स० १८५७ ह्या सालीं मुनसफीची परीक्षा दिली. नंतर कायदे बदलल्यामुळे हायकोर्टाचे हुकुमावरून खानदेशचे डिस्त्रिक्ट जज्ज साहेबांनी ह्यांची परीक्षा पुनः घेतली. तेव्हां त्यांना वकीलीची सनद इ० स० १८६४ सालीं मि- ळाली. त्या वेळापासून हे वकीलीचें काम करीत आहेत. धुळ्याची म्युनिसिपालिटी स्थापित झाल्यापासून, ह्म- णजे इ० स० १८६२ सालापासून, हे म्युनिसिपालिटींत में- बर आहेत. त्यांनीं कमेटीच्या चेअरमनचें काम किती- एक दिवस फार चांगलें केलें. आणि इ० स० १८८४ सालापासून हे कमेटीचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. लोकलफंड स्थापित झाल्यापासून ह्मणजे इ०स० १८६२ सालापासून, हे लोकलबोर्डाचे मेंबर आहेत. वइ०स० १८८४ सालापासून डिस्त्रिक्ट लोकलबोर्डाचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. ● महाराणीसरकारच्या राज्याच्या जुबिलीचे समारंभाच्या वेळेस ह्यांस सरकारांनीं रावबहादुर हा किताब दिला. ह्यासंबंधानें धुळे येथील लोकांनीं इ० स० १८८७ च्या