पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४

टिकतें असें नाहीं. दुसऱ्या वर्षी दुसऱ्याच प्रकारचें रान त्यांत उगवतें. आणि त्यास ती जमीन पहिल्यापेक्षां अधिक मानवल्यामुळें तें कधीं कधीं इतकें माजतें कीं, त्या शेतांत पहिल्या प्रकारच्या रानाचा मागमूस देखील राहात नाहीं. युरोपांतले लोक अमेरिकेंत गेले त्यामुळें अमेरि- केंतले मूळचे राहाणारे लोक त्यांच्यापुढे नाहींतसे झाले आहेत; त्याप्रमाणें, अमेरिकेमध्यें युरोपांतल्या गवताच्या कितीएक जाती लावूं लागल्यामुळे तेथल्या मूळच्या गव- ताच्या जाती नष्ट झाल्या आहेत.
 ह्याप्रमाणें वनस्पतिकोटीमध्यें आंतलेआंत जीवनार्थ कलह चालला असून, शिवाय वनस्पतिकोटि आणि प्राणिकोटि ह्यांच्यामध्यें जीवनार्थ कलह चालला आहे. तो असा. पानांच्या व फुलांच्या कळ्या पक्षी चावून टाकि- तात; पानें सुरवंट खातात; खोडाला वाळवी लागते; मु- ळाला कीड लागते. डार्विन ह्यानें तीन फूट लांब व दोन फूट रुंद असा एक जमिनीचा तुकडा खणून ठेविला, आणि मग त्यांत किती गवत व किती इतर झाडें उग- वलीं तीं मोजून पाहिलीं. तीं ३५७ भरलीं. परंतु पुढे थोड्याच दिवसांनी त्यांतले २९५ रोपे किड्यांनीं खा- ऊन टाकिले, अर्से त्यास आढळून आलें !!
 वनस्पतींस दुसऱ्या वनस्पतींपासून व प्राण्यांपासून कसे भय असतें तें वर स्पष्ट करून सांगितले आहे. परंतु, त्यांशिवाय, कमजास्त थंडी, वारा, पाऊस, उष्णता इत्या- दिकांपासून वनस्पतींस भय असतें तें वेगळेंच. असें. वनस्पतीला नियमित उष्णता, थंडी, प्रकाश इत्यादि जें कांहीं लागतें, त्याच्यापेक्षां त्याचा पुरवठा कमी