पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६

पाहिली. ती त्यास वीस वीस वर्षांची जीवंत देवदाराचीं खोडें सांपडलीं. ह्याचा अर्थ एवढाच कीं, वीस वर्षेपर्यंत तीं झाडें वर डोकीं काढण्याचा प्रयत्न करीत होतीं, परंतु, चरणाऱ्या गुरांनीं त्यांस बिलकूल वाढूं दिलें नाहीं. ह्मणजे, ती सगळी जमीन ओसाड राहाण्यास कारण तीं गुरें होतीं.
 प्राणिकोटींतला जीवनार्थ कलह सहज समजण्यासा- रखा आहे. एकाद्या प्रांतांतलीं कुरणें तेथल्या गुरांस मात्र पुरण्यासारखीं असतात, अधिक नसतात; आणि कांहीं किडे गवत खाणारे असतात, ते तेथें उत्पन्न झाले ह्मणजे, गुरे आणि किडे ह्यांचा जीवनार्थ कलह माजतो. परंतु, किड्यांना पक्षी खातात, गुरांना व्याघ्रादि हिंस्र पशु खातात, आणि घुशींसारखे प्राणी, कीडे आणि गुरें ह्या दोघांच्या अन्नाच्या - ह्मणजे गवताच्या पुरवठ्यास व्यत्यय आणितात. ह्याप्रमाणें प्राण्यांमध्यें आपसांत जी- वनार्थ कलह चालत असतो. ह्याचे परिणाम चमत्का- रिक होतात.
 आटर ह्या नांवाचें एक जनावर आहे; तें, सालमन ह्या नांवाचे मासे खाऊन उपजीविका करितें. आतां अशी कल्पना करा कीं, इतर मोठ्या माशांच्या खादाडपणामुळे सालमन मासे समुद्रांत कमी झाले, आणि आटर ह्यास खायास मिळेनातसे झाले. ह्मणजे अर्थातच आटर ह्यास जमिनीवरचे पक्षी व इतर प्राणी मारून आपला निर्वाह करावा लागावयाचा. ह्मणजे, सालमन माशांचा शत्रु प्रबल झाल्याने जमिनीवरच्या पशुपक्ष्यांचा संहार व्हाव- याचा ! दक्षिण अमेरिकेमध्यें पारागुए प्रांताच्या उत्तरेस