पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ओ. टिळक ग्रंथ संग्रहालय, नाई.
२५७

आणि दक्षिणेस रानघोडे व रानकुत्रे पुष्कळ आहेत; पण ते त्या प्रांतांत नाहींत. कां कीं, त्या प्रांतांत एकप्रका रची माशी आहे. ती, जनावरें उपजल्याबरोबर त्यांच्या बेंबीत आपलीं अंडी घालिते; त्यामुळे रानघोडे आणि रान- कुत्रे ह्यांची पिल्लें उपजल्यावर थोडक्याच वेळांत मरतात. आतां, त्या प्रांतांत कांहीं कारणानें जर कीटकभक्षक प क्ष्यांची वृद्धि झाली, तर त्या माशांचा संहार होऊन, तेथें रानघोडे आणि रानकुत्रे पुष्कळ होतील, आणि कुरणांचा नाश करितील. कुरणांचा नाश झाल्यानें कीटक कमी होतील; कीटक कमी झाल्यानें कीटकभक्षक पक्षी उपाशी मरून कमी होतील. असा हा प्रकार कोठपर्यंत जाऊन पोंचेल, ह्याची कल्पना देखील करितां येत नाहीं.
 हा जो जीवनार्थ कलह एवढा चालला आहे, त्याचें कारण काय, असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. त्याचें उत्तर एवढेच की, प्रत्येक जीवंत पदार्थापासून उत्पत्ति मोठ्या झपाट्यानें होऊन, प्रत्येक जीवंत पदार्थ आपली उ पजीविका करण्यास एकसारखा झटत असतो. "सबसें जीव प्यारा" हे ह्या कलहाचें मूळबीज आहे. एक प्रकारची माशी आहे. तिजपासून तीन महिन्यांत झालेली संतति जर जीवंत राहिली तर तिची गणती, एकाच्या आंकड्यावर वीस पूज्य द्यावीं तेव्हां कांहींशी बरोबर लिहितां येईल. आणखी ह्या पृथ्वीच्या पाठीवर अशा प्रकारच्या माशांच्या जाती अनेक आहेत. तेव्हां ह्यांची उत्पत्ति मनस्वी होत असेल हें उघड आहे. परंतु, ह्या जीवनार्थ कलहाच्या सिद्धां- ताप्रमाणें त्यांचा संहार निरंतर होत असतो. त्यामुळें त्यांची वाढ बेताची राहिली आहे. कीटकभक्षक प्राणी,