पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५८

थंडी, वारा, पाऊस, उष्णता इत्यादिकांनी जर ह्यांचा सं- हार झाला नसता, तर ह्या माशा पृथ्वीच्या पाठीवर अतो- नात झाल्या असत्या, आणि त्यांपासून माणसांस, इतर जीवांस, आणि वनस्पतींस मनस्वी त्रास भोगावा लागला ह्मणून त्यांचा जो संहार होत आहे, तो बरा आहे, ती ईश्वरी योजना आहे- अर्से ह्मणावें लागतें.
 मोठ्या प्राण्यांची गोष्ट अशीच आहे. कोलंबसानें अ- मेरिकेचा शोध लाविला, तेव्हां तेथें गुरें मुळींच नव्हतीं. तीं त्यानें आपल्या दुसऱ्या सफरीच्या वेळेस बरोबर तेथें नेलीं. तीं तेथें इतकीं वाढलीं कीं, सत्तावीस वर्षीत, त्या देशांत सात सात हजार गुरांचे कळप दृष्टीस पडूं लागले ! आ- स्त्रेलियामध्ये पूर्वी ससे मुळींच नव्हते. पण ते तेथें आली- कडे इतके वाढले आहेत की, त्यांस मारून मारून लोकांचे हात दमून गेले आहेत; आणि त्यांच्या पायीं पुष्कळ जमिनी ओसाड पडल्या आहेत. आणखी तेथल्या सरकारानें असा जाहीरनामा लाविला आहे की, त्या सशांस मारक असे रामबाण विष जो कोणी शोधून काढील, त्यास मोठें बक्षीस मिळेल !
 एकाच जातीच्या निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांत जीवनार्थ कलह चालतो. अठराव्या शतकास आरंभ होईप- र्यंत सगळ्या युरोपांतले उंदीर लहान काळ्या जातीचे होते. परंतु, त्या वेळाच्या सुमारास रशिया देशांत व्होल्गा नदीच्या कांठीं एक प्रकारचे मोठे भगव्या रंगाचे उंदीर उत्पन्न झाले. ते वाढतां वाढतां, सगळ्या युरोपभर तेच पस- रले आहेत, आणि पहिल्या लहान काळ्या उंदरांचा माग- मूसही नाहींसा झाला आहे. न्यूझिलंड बेटांत युरोपखंडां-