पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६१

लोकांच्या राज्यव्यवस्थेंत दृश्यमान झाली. प्रत्येक मनु- प्यास नैसर्गिक असे कांहीं हक्क आहेत, आणि राजसत्ता ह्मणून जी आहे, ती खरोखर लोकांच्या हातची आहे- ती लोकांचे हातून उत्पन्न होते — ती कोणाएका माण- सास जन्मतःच प्राप्त झालेली नसते – आणखी कायदे जे आहेत ते राजापासून रंकापर्यंत सर्वांनां एकसारखे लागू असून, सर्वीस न्याय मिळावा, सज्जनांचा प्रतिपाल व्हावा, दुर्जनांस शासनें व्हावीं, आणि प्रजेस सुख व्हावें हेंच स- गळ्या राज्यकारभाराचें सार्थक्य असावें, ह्याकरितां केलेले असतात. हे लोकांस शिकवावें – ह्या सुखावह मूलतत्त्वाचें प्रत्यक्ष दर्शन त्या लोकस्थितींत झालें.
 त्या देशांतल्या लोकांत सद्गुणं पुष्कळ होते. त्यामध्यें वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांत वेगवेगळे गुण दृष्टीस पडत. कोणेएके वेळीं कोणी एक परका माणूस एका ना- टकगृहांत गेला, आणि अथीनियन लोक ह्मणजे अथेन्स संस्थानांतले तरुण लोक बसले होते, त्यांत बसूं लागला. त्या वेळी त्यांनीं आपसांत हातपाय पसरून जागा अडवून त्याला बसूं दिलें नाहीं. तेव्हां त्या बापड्या वृद्ध माणसास वेड्यासारखें लोकांच्या तोंडाकडे पाहात उभे राहावें लागलें. तें, लासिडिमोनियन लोक जवळच बसले होते, त्यांनी पाहिलें, तेव्हां त्यांस फार वाईट वाटलें, आणि त्यांनी सर्वांनीं एकदम उभे राहून, त्या वृद्ध मनुष्यास जवळ बोलावून मोठ्या सन्मानानें आपणांमध्ये बसवून घेतलें. तें पाहून अथीनियन तरुणांस मोठें आश्चर्य वाटलें. आणि आपण चूक केली असे त्यांच्या मनांत येऊन, त्यांनी लासिडिमोनियन लोकांच्या औदार्याची आणि