पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०


व त्याच्याखालची सुई हीं एके ठिकाणीं राहून त्यांच्या खालचें मेणाचें नळकांडे जर एकाच जागीं फिरत राहिलें, तर त्या सुईच्या छिद्रांची एकच रेषा पडेल, आणि त्याच रेषेवर पुनः पुनः सुईचे आघात झाल्याने सगळी घाण हो- ईल. ह्मणून, त्या छिद्रांची रांग मळसूत्राप्रमाणें पडावी अशी योजना केलेली असते. ह्मणजे, तें मेणाचें नळकांडे फिरत असतांना, तो कांचेचा पडदा बाजूस सरकत जावा अशी युक्ति केलेली असते. असें करण्यास क चाकाच्या आंसाच्या ड भागावरचें मळसूत्र उपयोगी पडतें. तें असें: – फ ही एक चपटी पट्टी आहे, तिला तिच्या कांठावर ड मळसूत्रावरच्या फटींत उभे केलेलें असतें; आणि क चाकाच्या पलीकडे ड मळसूत्राशी समांतर अशी एक सळई असते, तिच्यावर सरकणारें एक लोखंडी नळकांडे बसविलेलें असतें; आणि त्या नळकांड्यास फ ही पट्टी व तो कांचेचा पडदा जोडलेला असतो. अशी व्यवस्था केल्यानें असें होतें कीं, क चाक फिरूं लागलें कीं म मेणाचें नळ- कांडे फिरूं लागतें, आणि फ ही पट्टी त्या मळसूत्राच्या फटीमधून उजवीकडे सरकूं लागून तो कांचेचा पडदाही उजवीकडे सरकूं लागतो; आणि ह्याप्रमाणें त्या सुईनें पडणाऱ्या छिद्रांची रांग मळसूत्रासारखी पडू लागते.
 चित्रांत दाखविलेला र हा वर सांगितलेला कांचेच्या पडद्याचा "लेखक" होय. सध्या तो मेणाच्या नळकांड्यावर नाहीं. भाषण किंवा गाणें “ल्याहावयाचें” असतें तेव्हां, त्या लेखकाच्या वरच्या बाजूस जी आंखुडशी नळी दि- सते, तिच्यावर नरसाळ्यासारखे जस्ताचें किंवा चित्राच्या बुडाशीं पडलेलें दाखविलें आहे तसें रबराचें टोपण बसवून,