पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१

तो लेखक त्या मेणाच्या नळकांड्यावर आणावा लागतो, आणि त्यांत मनुष्याचा किंवा वाद्याचा आवाज जाई असे करावें लागतें. याप्रमाणें " लिहिलेले" आपले शब्द किंवा गाणें पुनः ऐकण्याकरितां त्या "लेखका"चाच जर उप- योग केला, तर, त्याची सुई एका भोंकांतून दुसऱ्यांत जा तांना तिच्या अग्रानें मधलें सगळें मेण खरवडून जाईल. ह्मणून, "लेखक" वेगळा करून "वाचक" वेगळा केलेला असतो. त्याची रचना बहुतेक "लेखका" सारखीच अ सते; परंतु त्याच्या सुईचें टोंक तीक्ष्ण नसून वळिवलेलें व बोंथट असतें. हे "लेखक" व "वाचक" दोन्ही एकाच खुंटास चष्म्याप्रमाणें फिरते बसविलेले असतात, व तो खुंट, क चाकामागच्या सळईत जें नळकांडे बसविलेलें असतें ह्मणून सांगितलें आहे, त्याला जोडलेला असतो; सध्या, चित्रांत, "वाचक" व हा, मेणाच्या नळकांड्यावर आ- णून ठेविलेला आहे, आणि त्याला न ही जी नळी लाविली आहे, तिचीं शेवटें कानांत घातलीं तर त्या यंत्रांत भरलेला आवाज ऐकू येईल. ध्वनि लिहावयाचा असतो तेव्हां र लेखक नळकांड्यावर आणितात आणि "वाचक" नळ- कांड्यापासून दूर होतो. यंत्रांत भरलेला आवाज ऐकतांना ड ह्या स्क्रूचा असा उपयोग होतो कीं, “वाचका" ची सुई, "लेखका" नें केलेल्या छिद्रांच्या रांगेंतून बिनचूक रीतीनें जाऊन आवाज अगदी बरोबर उठतो. चित्राच्या डाव्याबाजूस अ व ब हे जे भाग दाखविले आहेत, ते क ह्या चाकास गति देण्याच्या व ती गति नियमित करण्याच्या संबंधाचे आहेत. गति देणारी मुख्य यंत्रें खालच्या पेटीत ठेविलेलीं आहेत. त्यांत विजेच्या योगानें गति उत्पन्न होते.