पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३

ज्यामध्यें लोकांत दोन धर्मपंथ प्रबल झालेले होते; एक रोमन क्याथोलिक आणि दुसरा प्राटेस्टंट. त्यांत रोमन क्याथोलिक हे लोक फार एककल्ली आणि दुराग्रही होते. आणखी इलिझाबेथ राणीच्या मागून जेम्सराजा गादीवर बसला, तो प्राटेस्टंट पंथाचा पक्षपाती होता. तेव्हां अ- र्थातच, रोमन क्याथोलिकांचा छल होऊं लागला. जेम्सरा- जानें कांहीं रोमन क्याथोलिक धर्माधिकाऱ्यांस हांकून दिलें, आणि जे कोणी रोमन क्याथोलिक प्राटेस्टंट देवळांत प्रार्थ- नेस येणार नाहींत त्यांनीं दोनदोनशें रुपये दंड दिला पाहिजे असा कायदा केला. तेणेंकरून तर क्याथोलिक लोक फारच चिथले. त्यांच्या पायांची आग मस्तकास गेली; आणि करवतील तितके प्रयत्न करून प्रॉटेस्टंट पक्षाचा नाश करावयाचा, सोडावयाचा नाहीं, असा त्यां- तल्या लोकांचा निर्धार झाला. त्याप्रमाणें त्यांच्यांतल्या कांहीं पुढाऱ्यांनी एक गुप्त कट केला. त्यांनीं असें मनांत आणिलें कीं, राजा आणि त्याची पार्लमेंट सभा ह्यांस एकदम नाहींसें करून टाकावें, ह्मणजे आपला त्रास कमी होऊन आपले मनोरथ सिद्धीस जातील. ह्मणून, त्यांनीं लार्डससभागृहाच्या खालचें एक भुयार भाड्याने घेतलें; त्यांत दारू, कोळसा वगैरे पुष्कळ ज्वालाग्राही पदार्थ भरिले; आणि पार्लमेंट सभा भरून तींत राजा विराजमान झाला ह्म- णजे त्या दारूस आग लावावी, हें काम गायफाक्स नांवाच्या एका माणसावर सोंपिलें. त्याप्रमाणे सर्व सिद्धता झाली. आणि आतां दोन तीन दिवसांत पार्लमेंट सभा भरावयाची, इतक्यांत, त्या कटांतला गृहस्थ फ्रान्सिस थ्रेशाम ह्यानें, आ- पला मेहुणा लार्ड मांटीगल ह्यास एक निनांवी पत्र पाठविलें.