पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

त्याचें तात्पर्य असें होतेंः- “महाराज, आपणांवर माझी भक्ति आहे, आणि आपलें संरक्षण व्हावें, अशी माझी फार इच्छा आहे; ह्मणून मी आपणांस अशी प्रार्थना करितों कीं, आपण कोणत्या तरी निमित्तानें, पार्लमेंट सभा आतां लवकरच भरावयाची आहे, तीस जाऊं नये. कां कीं सध्याच्या काळाच्या पापाचें परिमार्जन करण्याचा निश्चय देव आणि मनुष्यें ह्या उभयतांनी केला आहे. ह्या सूच नेंत कांही अर्थ नाहीं, असें समजूं नका. आपण बेला- शक स्वदेशी निघून जा. सध्या कोठें कांहीं हालचाल दिसत नाहीं, ह्यावर आपण जाऊं नये. ह्या वेळेस पा- र्लमेंटाचा समूळ नाश व्हावयाचा आहे. आणि हा नाश कोणी केला, हें कधीं कोणास कळावयाचें नाहीं. ही सूचना आपण थट्टेखालीं नेऊं नये. आपलें संरक्षण व्हावें, एवढेंच मी परमेश्वरापाशीं मागतों. तें तो मला देवो.”  हें पत्र लार्ड मांटीगल ह्यानें राजास दाखविलें. त्यावरून त्यास संशय उत्पन्न होऊन, त्यानें त्याविषयीं शोध चालविला. त्यावरून तें सगळें प्रकरण बाहेर आलें. गायफाक्स ह्यास त्या भुयारांत कांकडे तयार करितांना पकडलें. हें वर्तमान ऐकतांच कटांतले बाकीचे लोक पळून गेले; परंतु त्यांतले बहुतेक वाटेंत मारले गेले. त्या वेळापासून क्याथोलिक पं थाच्या लोकांस कितीएक पिढ्यांपर्यंत, पहिल्यापेक्षां शत- पट त्रास भोगावा लागला. ह्मणजे, जो उद्योग विपत्ति टाळण्याकरितां ह्मणून त्यांनी केला होता, तो, ती विपत्ति वृद्धिंगत करण्यास कारणीभूत झाला. हें वर्तमान इ० स० १६०५ ह्या वर्षी घडलें.  हें भयंकर कृत्य करण्यास मे महिन्याची पांचवी ता-