पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
द्रव्यास हे गमनमार्ग यथावकाश कीं दान भोग अथवा तिसरा विनाश.

ह्याचा सूक्ष्म विचार करून पाहिला ह्मणजे असें दि- सतें कीं, द्रव्याचा अत्युत्तम उपयोग दान होय. हें ज्यांस खरोखर कळतें, - ह्मणजे ह्याप्रमाणें कृति ज्यांचे हातून घडते ते भाग्यवान होत. त्यांतच दिनशा माण- कजी पेटिट ह्या थोर गृहस्थांची गणना आहे.त्यांचें संक्षिप्त चरित्र आह्मी येथें लिहितों.  दिनशा माणकजींचे आजे सुरत येथें राहात असत. ते इ० स० १७८५ ह्या वर्षी मुंबईस आले. पायांच्या मुखत्यारीचें काम करीत असत. ते १८१९ ह्या वर्षी निवर्तले. त्यांचे चिरंजीव शेट हे प्रथम दलालीचा व्यापार करीत असत. आणि मग ते स्वतंत्र व्यापारी झाले, आणि त्यांनीं बरेंच द्रव्य मिळविलें. ह्यांस इ० स० १८२३ ह्या वर्षी पुत्र झाला. तेच हे दिनशाजी होत. माणकजीशेट इ० स० १८५९ ह्या वर्षी मरण पावले. तेव्हां ते सत्तावन वर्षीचे होते.  दिनशाजी नऊ वर्षीचे झाल्यावर त्यांनी प्रथम गुजरा- थीचा अभ्यास केला. आणि मग कांहीं वर्षांनीं सार्जेंट साइझ ह्या नांवाच्या गृहस्थापाशीं ते इंग्रजी शिकले. व्या पारांत उपयोगी पडण्यासारखें ज्ञान त्यांस मेनवारिंग आणि कर्बट ह्यांच्या शाळेत प्राप्त झालें. हे चौदा वर्षीचे अ- सतांना ह्यांचें लग्न झालें. ह्यांचें वय सत्रा वर्षांचें झाल्या- वर ह्यांनी डायर आणि रिचमंड ह्या कंपनीच्या कचेरीमध्यें पंधरा रुपये दरमहाची नोकरी धरिली. त्याच कंपनींत त्यांचे वडील म्यानेजिंग क्लार्क होते. त्या कंपनीच्या