पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१

कारखान्यांत वाढता वाढता दिनशाजीस दरमाहा शंभर रुपये मिळू लागले. आणि मंग लवकरच, चाकरीचा पेशा सोडून देऊन, ते, त्या कंपनीच्या द्वारें स्वतंत्रपणें व्यापार करूं लागले. पुढें कांहीं वेळानें रिचमंडनें वेगळी कंपनी काढिली. तींत हे शेट मुख्य व्यवस्थापक झाले. त्या कामांत त्यांस देवानें चांगला हात दिला. शिवाय इ० स० १८६४ ह्या वर्षी हे आपल्या बंधूंपासून विभक्त झाले; तेव्हां वडिलोपार्जित चोवीस लाख रुपये संपत्तीचा हिसा त्यांस मिळाला. आणखी ती वेळ, अमेरिकेंतल्या लढाईमुळे, कापसाच्या तेजीची होती. तींत, पुष्कळ लक्षाधीश भिक्षेकरी झाले, आणि भिक्षेकरी लक्षाधीश झाले; पण, दिनशाजी हे पहिल्यापासून फार दूरदृष्टि आणि दक्ष असल्याच्या योगानें, त्या विनाशाच्या प्रवाहां- तून अजीबात बचावले. ह्मणजे, त्यांनी त्या गर्दीत द्रव्य कमाविलें, गमाविलें नाहीं. ही गोष्ट, व्यापायाच्या दृष्टीनें, अत्यंत महत्त्वाची आहे. त्या वेळच्या दिनशाजींच्या वर्तनाचा खरा साद्यंत वृत्तांत जर होतकरू व्यापारी मंड- ळीस कळला, तर तो त्यांस अत्यंत बोधपर होईल.  ह्या थोर गृहस्थांचा इतिहास ह्मटला ह्मणजे फारच मोठा आहे. तो सगळा येथें देण्यास आह्मांस अवकाश नाहीं. तथापि, त्यांतल्या कांहीं कांहीं मुख्य मुख्य गोष्टी येथें सादर करितों.  इ० स० १८६० ह्या वर्षी त्यांनीं माणकजी पेटिट स्पिनिंग आणि वीव्हिंग मिल नांवाची कापसाच्या सुताची व कापडाची गिरणी काढिली. सध्यां चीन, जपान, इत्यादि देशीं म्यांचेस्टरवाल्यांच्या कापडावर आमच्या मुंब-