पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२

ईच्या कापडाचा पगडा पडून म्यांचेस्टरवाल्यांचा व्यापार बुडत चालला आहे. हें पुष्कळ अंशीं दिनशाजींच्या उ द्योगाचें फळ होय.
 त्यांचे वडील वारले तेव्हां त्यांनीं पंचवीस हजार रु पये धर्म केला.
 इ०स० १८६० ह्या वर्षी ते जस्टिस आफू धि पीस झाले. त्याच वर्षी त्यांनीं हैड्रालिक प्रेस कंपनी ६,६५,००० रुपयांस विकत घेतली.
 इ० स० १८६१ ह्या वर्षी, ३०,००० रुपये खर्चून त्यांनीं पुण्यास चार सार्वजनिक हौद बांधिले.
 इ० स० १८६८ ह्या वर्षापासून हे मुंबई व्यांकेचे डै- रेक्टर आहेत.
 इ० स० १८७१ ह्या वर्षी त्यांनी अहमदनगर शह रास पाण्याची सोय करण्याकरितां १५,००० रुपये दिले. त्यांतले ६,२०० रुपये खर्चून तेथें एक चांगलें कारंजें वांधिलें आहे. तें ह्या गृहस्थांच्या नांवानें चालत आहे.
 त्याच वर्षी बलसाड येथें त्यांनीं एक धर्मार्थ दवाखाना स्थापिला; आणि आपल्या कुटुंबाच्या नांवानें एक धर्मार्थ दवाखाना चिंचणीतारापुरास घातला. शिवाय रत्नागिरी येथील महारोग्यांच्या दवाखान्याकरितां त्यांनीं १६,५०० रूपये दिले ते वेगळेच.
 इ०स० १८८३ ह्या वर्षी साकरवाईच्या नांवानें जनावरां- च्या दवाखान्याच्या स्थापनेस त्यांनीं पन्नास हजार रुपये दिले.
 दोन वर्षीमागें सर दिनशांनीं तीन लाख रुपये किंम तीची आपली एक इमारत सरकारच्या स्वाधीन केली. आणि ह्या त्यांच्या साह्याच्या योगानें व्हिक्टोरिआ जुबिली धंदे-