पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

शाळा जुन्या एल्फिन्स्टन कालेजांत स्थापितां आली आहे.
 इ० स० १८८५ ह्या वर्षी त्यांस मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनचे अध्यक्ष निवडिलें.
 इ० स० १८८७ ह्या वर्षी जुबिलीच्या महदुत्सवाचे वेळी त्यांस सरकारांतून "सर" ही पदवी मिळाली. ह्या गोष्टीच्या स्मरणार्थ त्यांनीं सवालाख रुपये स्त्रियांच्या पाठ- शाळेकरितां आणि इतर कामाकरितां दिले.
 ह्या सालीं त्यांनीं महारोग्यांच्या आश्रयस्थानाकरितां एक लाख रुपये दिले आहेत. त्या आश्रयस्थानाच्या पा याचा समारंभ येथें गेल्या मार्च महिन्यांत झाला.
 सर दिनशांनीं धर्मार्थकृत्यांकडे ज्या मोठमोठ्या रकमा दिल्या आहेत, त्यांपैकीं कांहीं मोठमोठ्या मात्र वर निर्दिष्ट केल्या आहेत. अशा या मोठाल्या देणग्यांची बेरीज घेतली असतां ती बारा लाखांवर जाते. ह्यांशिवाय ते शेंदो- नशेंच्या ज्या देणग्या देतात, त्या कोणास कळतही नाहींत. चांगल्या कामाकरितां साह्य मागण्यास त्यांजकडे गेलेला मनुष्य विन्मुख होऊन कधींही परत येत नाहीं.
 सर दिनशाजी साहा गिरण्यांचे एजंट, भागीदार आणि मुख्य आहेत. त्या गिरण्यांत सुमारें बारा हजार लोक काम करीत आहेत.

अशा किती जरी गोष्टी सांगितल्या, तरी त्यांच्या स- गळ्या वैभवाची पूर्ण कल्पना वाचणाऱ्यांच्या मनांत या वयाची नाहीं. तथापि, एक गोष्ट सांगितल्यानें त्या कल्प- नेचा बराच भाग त्यांच्या मनोदृष्टीपुढे उभा राहील, असें वाटतें. ती गोष्ट हीच कीं, आमच्या सध्यांच्या मोठ्या राजांतल्या एका राजाची स्वारी त्यांच्यायेथें पानसुपारीस