पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७

समाजोन्नति आणि राज्योन्नति ह्यांच्या संबंधानें उत्पन्न झाला आहे. त्याविषयी थोडा विचार केला पाहिजे.
 कोणतेंही फल झालें तरी आधीं प्रथम कोंवळें असतें, मग जून होतें, आणि मग पिकतें. हा क्रम सृष्ट आहे. ह्यांत कोणाच्याने कधीं फेरफार करवत नाहीं: त्याप्रमा- णेंच समाजोन्नति आधीं झाल्यावांचून राज्योन्नति होत नाहीं, असा साधारण नियम दिसतो. ह्याचीं ठळक अशीं एकदोन उदाहरणें अर्वाचीन इतिहासांत देखील आहेत. अमेरिकेंतील स्वतंत्र संस्थानें, रशिया आणि जपान ह्यांची सामाजिक स्थिति दोनशें वर्षीमागें कशी होती, आणि सांप्रतकाळी कशी आहे, ह्याची तुलना केली ह्म- णजे, त्यांच्या राज्योन्नतीविषयीं असें कबूल करावें ला- गतें कीं, ही राज्योन्नति, त्यांच्या समाजोन्नतीचें फल आहे. अमेरिकेंतल्या स्वतंत्र संस्थानांतले लोक मूळचेच सुधारलेले होते, आणि त्यांच्यांत समाजोन्नति पूर्वीच झालेली होती, ही गोष्ट कांहीं अंशीं खरी आहे. परंतु, त्यांच्यामध्यें जार्ज वाशिंग्टन, बेन्जामिन फ्रांक्लिन, अशा प्रकारची माणसं उत्पन्न होण्याइतकी ती पक्क झालेली नव्हती. त्याप्रमाणेंच रशियाचा बादशाहा पीटर धि ग्रेट ह्यानें फारशीं नवीं राज्यें काबीज केलीं नाहींत; परंतु, आपल्या लोकांत स्त्री- पुरुषांनी एकत्र जेवायास बसण्यापासून तों दरबारांत वा- गावयाचें करें येथपर्यंत, नवनव्या रीति चालू करून समाजोन्नति केली; तिच्या योगानें एकंदर रशियन लो- कांची योग्यता वाढून, त्यांच्या राष्ट्राची गणना, सांप्रतका- ळच्या अत्यंत प्रबल राष्ट्रांत झाली आहे. तसाच थोडासा प्रकार जपानचा आहे. नकाशावर पाहिलें तर जपान