पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३

दिसत नाहीं. ह्मणून, स्थलविशेषीं चंद्रग्रहणांपेक्षां सूर्यग्र हणें कमी होतात. गेल्या ८ वर्षीत पृथ्वीवर चंद्रग्रहणें एकंदर १२ झालीं, त्यांपैकी ह्या देशांत ६ दिसलीं; आणि सूर्यग्रहणें एकंदर १९ झालीं, त्यांतलीं ३ मात्र ह्या देशांत दिसलीं. आणि तींही सर्वत्र दिसलीं नाहींत. ह्या एकूणीस ग्रहणांपैकीं ७ खग्रास होतीं, आणि ६ कं- कणाकृति होतीं. सन १८८२ च्या मे महिन्यांत एक झालें. तें हिंदुस्थानांत अगदी दक्षिणेकडच्या लोकांस दिसलें नाहीं. सन १८८७ च्या आगष्टामध्यें दुसरें झालें. तें अन्यदेशीं खग्रास दिसलें, परंतु, हिंदुस्था- नांत खंडग्रहणच दिसलें. आणि तें तरी उत्तरहिंदुस्था- नांतल्या उत्तरभागच्या लोकांस मात्र दिसलें; सर्वत्र दि- सलें नाहीं. गतवर्षी जूनमध्ये तिसरें झालें. तें अन्य- देशीं कंकणाकृति दिसलें; परंतु ह्या देशांत खंडितच दि- सलें. आणि तेंही दक्षिण हिंदुस्थानांतल्या दक्षिण भा गच्या लोकांस मात्र दिसलें. ह्या आठ वर्षांपूर्वीच्या ११ वर्षीत हिंदुस्थानांत चंद्रग्रहणें १४ आणि सूर्यग्रहणें ६ दिसलीं. ह्यावरून दिसून येईल कीं, सूर्यग्रहणें पु ष्कळ पडतात, तरी थोडीं दिसतात. त्यांतही खग्रास- ग्रहण आणि कंकणग्रहण हें देशविशेषीं आणि त्यांतही स्थलविशेषीं फार वर्षांनी दिसतें. इंग्लंडांत इ० स० ११४० ह्या वर्षी खग्रास सूर्यग्रहण पडलें होतें; त्यावर पुनः १७१५ ह्या वर्षी पडलें. ह्मणजे, मधल्या पावणे सहाशें व- पौत खग्रास सूर्यग्रहण इंग्लंडांत मुळींच पडलें नाहीं. शा- लिवाहन शके १७६९ च्या भाद्रपदांत ह्मणजे इ० स० १८४७ च्या आक्टोबर महिन्यांत मुंबई येथें व आसपा-