पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

सच्या प्रदेशांत कंकणाकृति सूर्यग्रहण झालें होतें; त्यावर आजपर्यंत ह्मणजे ४३ वर्षांत मुंबईस तसे ग्रहण झालें नाहीं. ह्यावरून असा चमत्कारिक योग किती विरळा दृष्टीस पडतो, हें दिसून येईल.
 हे सध्यांचें सूर्यग्रहण दक्षिणहिंदुस्थानांत कंकणाकृति दिसावयाचें नाहीं, ख आकृतीप्रमाणे दिसेल. दुस्थानांत कांहीं प्रदेशांत मात्र हें कंकणाकृति दिसेल. हिंदुस्थानचा नकाशा हातांत घ्यावा; त्यांत डेराइस्मायल- खान, फरीदकोट, पाणिपत, मुरादाबाद, बरेली, गोरखपूर, आणि मौंगीर या शहरांतून जाईल अशी एक रेषा काढावी. त्या रेषेवर जितकीं स्थलें आहेत, तितक्या स्थलींच्या लोकांस आणि तिच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे ५० मैलपर्यंत जीं स्थलें आहेत तेथच्या लोकांस हें ग्रहण कंकणाकृति दिसेल. ह्या प्रदेशांत फिरोजपुर, फिरोजशहा, नाभा, प- त्तियाला, स्थानेश्वर, रामनगर, रामपुर, अयोध्या, पाटणा, दुर्भंग, राजमहाल, मुर्शिदाबाद, आणि डाका हीं प्रसिद्ध शहरें आहेत. ह्या प्रदेशाच्या दक्षिणभागीं ख आकृतीप्र- माणें आणि उत्तरभागीं ग आकृतीप्रमाणें हें ग्रहण खंडाकृति दिसेल. त्यांतही जसजसे दक्षिणेस किंवा उत्तरेस जावें, तसतसा ग्रास कमी दिसेल. कंकणाकृति दिसण्याच्या प्रदेशाची मध्यरेषा जी वर सांगितली आहे, तिजवर ग्रह- णाची कंकणाकृति सुमारें ४ मिनिटें दिसेल; आणि इतर प्रदेशीं कमी वेळ दिसेल. पृथ्वीवर कांहीं अन्यदेशींही हें ग्रहण कंकणाकृति दिसणार आहे. ही कंकणदर्शन- प्रदेशाची मध्यरेषा कास्पियन समुद्राचा दक्षिण किनारा, एशियामायनर, क्यांडिया बेट, त्रिपोली देश, आणि सेनि-