पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५

हवेंतल्या प्राणवायूनें घडत नसून, एकाप्रकारच्या अत्यंत सूक्ष्म सेंद्रिय पिंडांच्या योगानें घडून येते. हे पिंड हाल- तात, चालतात, धांवतात, आणि इतर प्राण्यांप्रमाणे त्यांना भूकही लागते, व त्यांची उत्पत्तिही फार होते. ह्यांचें बीज हवेंत असतें. त्यांचा संपर्क ताडी वगैरे पदार्थांबरोबर होतांच, ते, त्या पदार्थातील ज्या घटकावयवांची दारू होते, ते पदार्थ भक्षून त्यांचें पृथक्करण करितात, आणि तेणेंकरून त्या पदार्थांची दारू होते. त्याचप्रमाणें, दारू पुष्कळ दिवस राहिल्यानें आंबट होते, त्यास कारण दु- सया एका प्रकारचे सेंद्रिय पिंड होत, असेंही त्यांनीं सिद्ध केलें. ह्या त्यांच्या शोधाच्या योगानें दारूच्या व्यापायांस फार नफा झाला आहे. कारण, दारू एकदां पवून तींतले हे पिंड मारून टाकिले ह्मणजे ती को- णीकडेही पाठविली तरी आंबत नाहीं. कितीही उंची दारू असो, ती, ११२° फेरनहैट उष्णतामानापर्यंत तापवून एक क्षणभर तशीच ठेवावी, ह्मणजे तिच्यांतले ते पिंड नाश पावून, ती पुष्कळ दिवस न आंबतां टिकते.
 ह्यानंतरचा त्यांचा शोध साधारण व्यवहाराच्या संबं- धाचा नाहीं. विशेषेकरून तत्वज्ञानविषयक आहे. त्याचें हे स्वरूप असेंः – ह्या पृथ्वीवरचे सर्वात खालच्या प्रतीचे जीव स्वतःसिद्ध असतात – ह्मणजे आपोआप उत्पन्न होतात,- मत अरिस्टाटलाच्या वेळेपासून पुष्कळ गाजत आहे, आणि पुष्कळ अर्वाचीन शास्त्रज्ञांनीं ह्या मताच्या पुष्ट्यर्थ प्रयोग करून दाखविले आहेत. परंतु, पास्तूर ह्यांनी त्या प्रयोगांमध्ये चुक्या दाखवून असे सिद्ध केलें आहे कीं,