पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६

ते सूक्ष्म जीव स्वतःसिद्धपणें कधींही उत्पन्न होत नाहींत; दुसन्या जीवांपासूनच उत्पन्न होतात.
 ह्यानंतरचा पास्तूर ह्यांच्या बुद्धीचा पराक्रम ह्मटला ह्मणजे रेशिमाच्या किड्यांच्या रोगाची परीक्षा होय. ह्या संबंधानें फ्रान्स देशानें त्यांचें फार उतराई झालें पाहिजे. कां कीं, रेशीम उत्पन्न करण्याचा व त्याचे कपडे तयार करण्याचा धंदा करून हजारों फ्रेंच लोक उपजीविका करीत आहेत; त्या धंद्यास धक्का बसणें ह्मणजे त्या लोकांच्या उपजीविकेचा मार्ग खुंटणें होय; आणि असा प्रसंग त्या लोकांवर आला होता. सन १८४९ ह्या वर्षापर्यंत त्या रेशिमाच्या धंद्याचें उत्पन्न दरसाल सुमारें तेरा कोटि फ्रांक ( एक फ्रांक ह्मणजे सुमारें दोन आणे ) होत असे. परंतु त्या सा- लापासून रेशिमाच्या किड्यांस एकप्रकारचा रोग लागून तें उत्पन्न हळू हळू कमी कमी होत चाललें तें कमी होतां होतां १८६९ ह्या वर्षी तीन कोटि फ्रांक मात्र झालें; ह्मणजे दाहा कोटि फांकांचा तोटा झाला. त्या रोगावर कांहीं तरी औषध शोधून काढावें, अशा विनंतीचा एक मोठा अर्ज त्या सगळ्या लोकांनीं फ्रेंच स- रकाराकडे केला. तेव्हां लोकांच्या आग्रहावरून, पूर्वी त्या विषयाचा कधींही विचार केला नव्हता तरी, पास्तूर ह्यांनीं त्या रोगाचा शोध करण्याचें काम हातीं घेतलें. त्यापूर्वी कितीएक वैद्यांनीं ह्या रोगाच्या कारणाचा शोध करून पाहिला होता, आणि रोगी किड्याच्या आंगांत त्यांस एक प्रकारच्या विलक्षण आकाराच्या अत्यंत सूक्ष्म गोळ्या सांपडल्या होत्या; परंतु त्या रोगाशीं त्या गो- ळ्यांचा काय संबंध आहे, तें त्यांना कळले नव्हतें. परंतु,