पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८

 या विषाच्या संबंधानें. अलीकडे दिवसानु- सिद्ध होत चालले आहे कीं, बहुतेक सर्व रोगांचें मूळ कारण अत्यंत सूक्ष्म जीव होत. आणि ह्याच दिशेनें त्यांवरच्या उपचारांचें धोरण बसत चालले आहे. वैद्यशास्त्राचा दुसरा एक असा सिद्धांत आहे कीं, कोण- ताही रोग, अत्यंत सूक्ष्म रूपानें आंगांत भिनलेला असला ह्म- णजे, त्या रोगाच्या भयप्रद प्रकारापासून प्राण्यास बिलकूल पीडा होत नाहीं, निदान कमी त्रास तरी होतो. गोस्तनदेवी काढल्या ह्मणजे माणसाच्या आंगांत देवींचें विष सूक्ष्ममा- नानें एकदां भिनतें, आणि मग त्याला देवींपासून पुनः भीति नसते. ह्या धोरणानें पास्तूर ह्यांनीं गुरांच्या रोगावर व कुत्र्यांच्या विषावर उपाय काढिले आहेत. पोटांत शूळ होतो, रक्त टेंडळूं लागतें, आणि कधीं कधीं आंगावर ठिक- ठिकाणीं सूज येऊन गुरूं तडाक्यासरसें मरतें, असा एक रोग गुरांस होतो; त्याला गोळीचा रोग ह्मणतात. हा रोग झालेल्या गुरांच्या रक्तांत सूक्ष्मदर्शक यंत्रानें काठीच्या आकृतीचे जीव दिसतात. ते कांहीं जीव निरोगी जनावराच्या कातडीला छिद्र पाडून तिच्या खालीं रक्तांत सोडिले, ह्मणजे त्याचें सगळें रक्त त्या जीवांनीं गजबजून जाऊन तें जनावर ४८ तासांत मरतें. पास्तूर ह्यांनी अनेक प्रयोग करून असे सिद्ध केलें आहे कीं, हे जीव असलेली लस घेऊन, तिजपासून, कृतीनें, एकीपेक्षां दुसरी कमजोराची, अशा दोन प्रकारच्या लसी तयार कराव्या, आणि त्यांपैकीं अगदी कमजोराची लस घेऊन, ती कोणत्याही जनावराच्या कातडीखालीं घालावी, ह्मणजे त्याला एक दिवस थोडा ताप मात्र येतो, नंतर दाहा पंधरा दिवसांनीं जास्त जोराची लस त्याच्या आंगांत