पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
की. टिळुक अब संपालप वार्ड

,

घालावी; ह्मणजे, त्या जनावरास अत्यंत जालीम लसीपा- सून, आणि त्या रोगाच्या भयंकर सांतीपासूनही बाधा होत नाहीं. फ्रान्स देशांत ह्याप्रमाणें जनावरांना निवेश करण्याची पद्धति सुरू केली आहे; आणि ह्यामुळे दरसाल लाखों जनावरांचे प्राण वांचत आहेत. गोळीच्या रोगापासून पूर्वी जितकीं जनावरें मरत होतीं तितक्यांचा दाहावा हिस्सा मात्र तीं आतां मरतात. पास्तूर ह्यांच्या पद्धतीनें इकडील जनावरांना निवेश करितां यावा ह्मणून पास्तूर इन्स्टिट्यूट नांवाची एक शाळा पुणे येथें आलीकडे स्था- पिली आहे. तेथें विद्यार्थ्यास ही विद्या शिकविणार आ हेत, आणि तेथून सगळ्या इलाख्यांत लसीचे दोन्ही प्रकार सरकार पाठविणार आहे. शिवाय, गुरांच्या इतर रो- गांच्या संबंधानेंही शोध करण्याची साधनें त्या शाळेत ठेवणार आहेत.
 आतां, पास्तूर ह्यांच्या बुद्धीचा अगदी आलीकडचा पराक्रम सांगावयाचा आहे. त्यांनीं पिसाळलेल्या कु- त्र्याच्या विषावर सन १८८० ह्या वर्षी प्रयोग करण्यास आरंभ केला; आणि एकसारखे पांच वर्षे इतर प्रा- ण्यांवर प्रयोग केल्यानंतर आपल्या उपायाविषयीं त्यांना खातरी वाटू लागली. त्या उपायाचा प्रकार गोळीच्या रोगा- वरच्या उपायासारखाच आहे. कुत्र्याच्या विषाची लस कृतीनें अगदीं कमजोर तयार करून, तिनें माणसांना व कुत्र्यांना निवेश करितात; आणि मग कांहीं दिवसांनीं जास्त जोराच्या लसीनें निवेश करितात. ह्मणजे आणखी फार जोराची लस जरी आंगांत भिनली, किंवा प्रत्यक्ष पि साळलेला कुत्रा जरी चावला, तरी त्या माणसांला