पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३

मोठा दुर्गुण आहे, हे त्याला ठाऊक होतें; आणि तें तो प्रांजलपणें कबूल करीत असे. तथापि, आपण जसे शौर्य- धैर्यादिकांत सर्व माणसांत श्रेष्ठ आहों, तसे मद्यपानांतही श्रेष्ठ आहों, असें दाखविण्याची त्याची फार इच्छा असे; आणि त्याकरितां तो मनस्वी दारू पीत असे. आणखी त्याला इतक्या तरुणपणांत जें मरण आलें, तें त्यामुळेंच . आलें. ह्मणजे, तात्पर्य सांगायाचें एवढेंच कीं, शिकंदरास आत्मजय करितां आला नाहीं. तसा तो पुष्कळांस क रितां येत नाहीं; कां कीं; तो तसाच कठिण आहे.
 आत्मजय करायाचा ह्मणजे सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घ्यावयाचा असा करावयाचा नाहीं; तर आत्मजय ह्मणजे, जें चांगलें- ' जगीं वंद्य ' - तें करायाचें, आणि जें वाईट - ' जगीं निंद्य ' -तें करावयाचें नाहीं, अशा निश्च- यानें मन बद्ध करणें होय. शिवाजीमहाराज, पीटर धि ग्रेट, बाजीरावसाहेब, साक्रेटिस, रामशास्त्री, मार्टिन लूथर, ह्या सर्वांनीं आत्मजय केला होता. ह्मणूनच त्यांची नांवें, निळ्या आकाशांतल्या तेजस्वी तान्यांप्रमाणें, जगाच्या इतिहासांत चमकत आहेत. प्रपंचांत लोभ पाहिजे; त्या- शिवाय चालत नाहीं. परंतु, त्याला देखील मर्यादा पा- हिजे. ह्मणजे; त्या संबंधानें देखील एके प्रकारें आत्मजय केला पाहिजे. प्राचीन काळीं ग्रीस देशाच्या एका स्थानामध्यें पैहस ह्मणून एक राजा होता. तो मोठा प- राक्रमी होता. तो एकामागून एक देश जिंकीत सुटला; आणि त्याच्या चित्तास स्वस्थता नाहींशी झाली. हून, त्याचा प्रधान सिनीज हा मोठा तत्वज्ञानी होता, तो