________________
तारका. तारकाः ___मागील १५ प्रकरणांत आपण बहुधा आपल्या सर्यमालेचाच विचार केला. आतां आपल्या सूर्यासारखे किंवा त्याहून फार मोठे जे असंख्यात सूर्य आकाशात पसरले आहेत ते यथाशक्ति पाहूं. नुसत्या डोळ्यांनी सहा प्रतींच्या तारा दिसतात. सहा इंच भिगाच्या दुबिणीतून समारे १३ प्रतीच्या दिसतात. आणि पृथ्वीवरील अति मोम्या दावणातून १६ प्रतींच्या दिसतात. कोणी तारांच्या २० पर्यंत प्रती केल्या आहेत. एका प्रतीच्या तारेचें तेज खालच्या प्रतीच्या तारेच्या समारे २॥ किवा २॥ पट अताआणि एका प्रतीच्या तारांची संख्या आकाशांत जितकी आहे तिच्या सुमार शाह किवा ३ पट खालच्या प्रतीच्यांची आहे. एका प्रतीच्या सर्व तारा एकत्र करया तर वरच्या प्रतीची समारें एक तारा होईल. ही अनुमाने केवळ डाळ्याना दिस णाऱ्या तेजावरून बसविलेली आहेत. यामळे ती स्थूल आहेत. प्रकाशमापक या नांवाचे यंत्र हल्ली निघाले आहे. त्यावरून तेजाचे मान सूक्ष्म समजते. परंतु त्यावरून तारांच्या प्रती अजून ठरल्या नाहीत. हल्ली फार सूक्ष्म अशी तारास्थितिपत्रके पुष्कळ झाली आहेत. त्यांत सुमारे २० हजार तारांची स्थिति आहे. उत्तरध्रवापासून दक्षिणक्रांति २ पर्यंत असणा या ९ प्रतींच्या तारांचे एक स्थूल स्थितिपत्रक झाले आहे. त्यांत सुमारे ३ लक्ष तारा आहेत. ही संख्या समारे अर्ध्या आकाशांतली आहे. नुसत्या डोळ्यांनी अध्यो आकाशांत ३ हजार तारा दिसतात. यावरून नुसत्या डोळ्यांनी जेथे एक तारा दिसते तेथें मध्यम दुर्बिणीतून सरासरी १०० तारा दिसतात. तारांच्या राशींविषयी मार्ग सांगितलेच आहे. युरोपियन नांवांप्रमाणे त्यांच्या आकृति हल्ली मुळीच दिसत नाहीत असे म्हटले तरी चालेल. दुर्बिणीतून दिसणाऱ्या असंख्य तारांनी आकाशगंगा झालेली आहे. अशा तारा आकाशगंगेपासून दूरच्या प्रदेशांत थोड्याच आहेत; जसे जसे आकाशगंगेकडे पहात यावें तशा तशा दाट आहेत. नुसत्या डोळ्यांनी दिसणाच्या ताराही आकाशगंगेत जास्त आहेत. आकाशगंगेखेरीज इतर प्रदेशांतही कोठे कोठे फार दाट तारा आहेत. रूपविकारी तारा:-कांही तारांचे तेज नेहमी एकसारखे नसते; कमजास्त होते. अशा तारा सुमारे १४३ आहेत. त्यांत ज्यांचा रूपविकार सहज समजण्यात येतो अशा २ आहेत. ययाति नामक पुंजामध्ये एक तारा आहे. १८९३ च्या आरंभी तिचे विषुवांश ३।१।१२ व क्रांति उ०४०।३३।३६ आहे. हिला अलगोल असें युरोपियन (मूळचे आरबी) नांव आहे. ती साधारणतः दुसऱ्या प्रतीची दिसते. २ दिवस २० तास व ४९ मिनिटें इतक्या कालांत तिच्या रूपांत एकदा फरक होतो. एकदां तेज कमी होऊ लागले म्हणजे सुमार शा तासात ती