या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वर्षाताई शांत बसलेल्या जणु एखाद्या डोंगरात सुरंग लावावा आणि त्याच्या आवाजाने कानात दडा बसावा तसे झाले. वर्षाताईंना सारिकाने सगळ सांगितले. मी आशाताई आहे. लेकरांच्या बाबतीत काळजी घेणे माझ कामच आहे. पण ही घटना मी शांतपणे बघु शकत नाही. तुम्हीच सांगता अन्याय बघत बसणारा मोठा दोषी.

 वर्षाताईंनी सारिकाला मुली तुझ्याकडे क्लासला आल्या की मला फोन कर मी एक माझ्या कार्यकर्त्याला पाठवून त्यांचे काय म्हणणे आहे ते रेकॉर्ड करु. ताईंना विचारुन सारिका हो म्हणाली आणि निघून गेली दुस-या दिवशी सारिकाचा फोन आला की त्या मुली माझ्याकडे आल्यात तुम्ही लवकर या. सारिकाचा फोन झाल्याबरोबर वर्षाताईंनी एक कार्यकर्ता पाठविला.त्या कार्यकत्र्यांना सत्यता तपासली व घटना सत्य असल्याचे सांगितले,पुरावा ही दिला.तो पुरावा घेउन ताईंनी योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार दाखल केली आणि त्या आश्रम शाळेवर कारवाई झाली.

 सारिका आशाताई होती, थाइसी होती. तीच्या या धाडसाने मुलींवर होणारा अन्याय थांबला. त्या शिक्षकाला अटक झाली. वर्षाताईंनी तिच्या धाडसांच कौतुक केले. आता ती गावातील प्रश्नांना कणखरपणे सामोरी जाते. चुकीचे असल्यास विरोध ही करते. खरचं,सारिकाताई सारख्या आशाताई या आदर्श आहेत.

२९