या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १२ सदर कायद्यांच्या अंमलबजावणी बाबत समितीने कोणती भूमिका पार पाडावयाची आहेत ?
उत्तर: ग्राम बाल संरक्षण समितीवर बालकांवर परिणाम करणाऱ्या या विविध समस्या बाबत म्हणजेच बालविवाह बालकामगार, अनैतिक व्यापार, बालकांचे लैंगिक शोषण याबाबत प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे.

म्हणूनच बालकांशी संबंधीत
■ बाल विवाह प्रतिबंधक कायदा
■ बालकामगार प्रतिबंधक कायदा,
■ बालकांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा,
■ बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणारा कायदा
■ बालके आणि स्त्रिया यांच्यावर कुटुंबातंर्गत होणाऱ्या हिंसेपासून संरक्षण करणारा कायदा २००५

 या कायद्यांचे उल्लंघन आढळल्यास अशा घटना बाबत योग्य ती कायदेशीर भूमिका संबंधित यंत्रणेस घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी संबंधीत ग्राम बाल संरक्षण समितीची आहे कायदेशीर कारवाई करणाऱ्या यंत्रणेस तक्रार दाखल करून सहकार्य करणे ही ग्राम बाल संरक्षण समिती आणि कृती दलाची जबाबदारी आहे. थोडक्यात ग्राम बाल संरक्षण समितीने घटनेची नोंद घेऊन तक्रारदाराची भूमिका पार पाडावयाची आहे.

१३