या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारिका बाचवळली, ताई हसुन म्हणाल्या, अग, तु मघाशी तुम्ही काहीतरी करा अस म्हणालीस, आता तुम्ही पेक्षा आपण सगळे मिळून काहीतरी करु, अस म्हणायला पाहिजे.

 सारिका म्हणाली खरच की असेच म्हणायला पाहिजे. सारिका हसत म्हणाली, पण सारिका मघाशी तु आल्या आल्या नाराज होतीस ते फक्त रस्त्यासाठी का वेगळे काही कारण ?

 सारिका हळूहळू मनातल्या गोष्टी सांगु लागली. "काल एक लग्न झालेली मुलगी परत आली मागच्या वर्षी गावातच तीच लग्न झाल होत. मुलगी १५ वर्षाची होती. मी खुप सांगितल होत पोलीसांना, गावातील पाटलांना, सरपंचाना सगळ्यांना सांगितल पण कोणीही दखल न घेता तीचं गावात सोनारबाबा मंदीरात लग्न लागले.

 आता तिचा नवरा तिला त्रास देतो, घरकाम, उसतोडीला जाव लागत. तशी लहानच की ती कस झेपायचा संसार तिला? मग ती आली परत, सोडूनच आली. 'अग पण एवढ्या लहान वयात कशाला लग्न लावायचे ? कळत कस नाही लोकांना ?ताईंनी जरा रागाचा सूर धरला.

सारिका सुद्धा भडकून बोलू लागली. 'ताई कळतच नाही लोकांना. मला कळत नाही १४ व्या १५ व्या वर्षी लग्न लावतात. १८ वर्षे पुर्ण होण्याची ३ ते ४ वर्षे सुध्दा वाट बघत नाहीत. ४ वर्षे पोरगी जड वाटते का?' सारिकाचा आवाज वाढत होता. खरतर हे बोलण्याची ताकद तिला लेक लाडकीच्या ऑफीस मध्ये येऊन वर्षाताईंना भेटून मिळाली होती.

सारिका गावात आशाताई म्हणून काम करतात. गावातल्या सगल्या प्रश्नांची त्यांना जाण होती. परिस्थिती बदलली पाहिजे, अशी तिची मनापासुन इच्छा होती. हळुहळु मिटिंगसाठी बाकीच्या आशाताई यायला सुरुवात झाली. हॉलपूर्ण भरला. १०० आशाताई मिटिंगला हजर होत्या.

 वर्षाताईंनी मिटींगला सुरुवात केली. आपल्या भागात सर्व मुली व बालकांना सुरक्षित असे वातावरण निर्माण केले पाहिजे. त्यांच्या शिक्षणाचा तसेच आहार, आरोग्य यांच गांभिर्याने आपण विचार करणे व सुरक्षित समाज निर्माण करणे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तसे आपण आता सामुहिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

२७