या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न ३.एकात्मिक बाल संरक्षण योजनेची उद्दिष्टे सांगा.
उत्तर :

 एकात्मिक बाल संरक्षण योजनेची केंद्र शासनाने आखून दिलेली उद्दिष्टे

१)बालकांना अत्यावश्यक सेवा व सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण करणे २)सर्व संबंधित संस्थामधील (शासकीय/अशासकीय) व्यक्तीची क्षमता वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबविणे.
३)बालकांच्या संरक्षणाच्या संदर्भातील सर्व प्रकारची (सर्व विभागांकडील) सांख्यिकीय व गुणात्मक माहिती संकलित करणे.
४)कौटुंबिक व सामाजिक स्तरावर बाल संरक्षणाला बळकटी देण्यासाठी त्या स्वरुपाच्या कार्यक्रमाची अंमल बजावणी करणे.
५)बालकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणाऱ्या सर्व शासकीय/निमशासकीय व सामाजिक संस्थाशी बालकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने समन्वय साधणे.
६)बाल संरक्षण बाबी विषयी समाजामध्ये जनजागृती करणे.

७) बालकांसदर्भातील सर्व कायद्यांची अंमलबजावणी करणे.