या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

     ग्राम बाल संरक्षण समिती रचना


 १) अध्यक्ष  - सरपंच किंवा ग्रामस्तरावर निवडून आलेला प्रतिनिधी (प्रत्येकी १)
    (ग्रामपंचायतीद्वारा नियुक्त केलेला / केलेली)
 २) सदस्य  - पोलीस पाटील (प्रत्येकी १)
 ३) सदस्य  - आशा सेविका (प्रत्येकी १)
 ४) सदस्य  - प्राथमिक / माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक (प्रत्येकी १)
 ५) सदस्य  - शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष (प्रत्येकी १)
 ६) सदस्य  - स्थानिक सामाजिक प्रतिनिधी (स्वयंसेवी संस्था, बचतगट, महिला मंडळ) (प्रत्येकी १)
 ७) सदस्य  - वय वर्षे १२ ते १८ वयोगटातील मुलगा प्रतिनिधी (प्रत्येकी १)
 ८) सदस्य  - वय वर्षे १२ ते १८ वयोगटातील मुलगी प्रतिनिधी (प्रत्येकी १)
 ९) सदस्य सचिव - अंगणवाडी सेविका (प्रत्येकी १)

  वरील सर्व प्रतिनिधींची निवड ग्रामसभेमध्ये किंवा विशेष ग्रामसभेमध्ये १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार ३० दिवसांच्या आत करण्यात यावी. या सदस्यांपैकी जास्तीत जास्त महिला सदस्य असतील असे पहावे.
  कायद्याने अस्तित्वात आलेल्या सदर समितीच्या प्रत्येक सदस्याला कायद्याच्या कक्षेत राहून बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदारीने काम करावे लागेल.