पान:बाळमित्र भाग २.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-९२ बाळमित्र. ह्यांनींच इतका राग आणला; असें ह्मणून तिने ते आं- बे तिरस्काराने रस्त्यावर फेंकून दिले, आणि ह्मणाली, बापूराया आपण गडी झालों, पण मी आतां आईकडे कशी जाऊं १ आईकडे जाणे घडते तर मौज असती. मग बापू ह्मणाला, थांव, हा मी आईकडे जाऊन तिची रजा घेऊन येतो. असें बोलून धांवत जातां जातां म. णतो, तूं तिजवर रागें भरलीस ह्याचे कारण मीच, का. की मी प्रथम तुला रागें भरविले होते, हे मी आईला सांगतो. इतका शब्द बोलतां बोलतां लांब गेला. मग तो आईजवळ जाताच आईने त्या मुलांचा मनोरथ तन्क्षणी सिद्धीस जाऊ दिला. अशा न्या दोन मित्रांचे मित्रत्व पाहून कोणी सुशील सद्गुणावर दृष्टि दे- ऊन दुसन्याचा दुर्गुण मनांत आणणार नाही. करनकरी स्वभावाचें वर्णन. जनाबाई आणि तिची कन्या मनी मनी- नाहीं आई, परकरापेक्षां कांचोळीच अगोदर शिवावी असे मला वाटते. जना- अगे, अगोदर एवढा परकराचा चीण शीव; मग पाहिजे तर कांचोळी शिवावयास लाग. तुझ्या चुलत बहिणीला परकरच आवडतो, ह्यासाठी आधी . तेवढा तो तयार कर, मग दुसरे काम हाती घे.