पान:बाळमित्र भाग २.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करनकरी स्वभावाचे वर्णन. मनी- तें नाहीं मी करावयाची; अगोदर कांचोळीच शिवीन, ती तिला आवडते. जना०- अगे, कांचोळी अझून बेतली देखील नाहीं; शिवतेस कायर परकराचा चीण राहिला आहे, तेव- ढा शीव, मणजे काम झालें. तुझे चुलत बहिणीचा आज वाढवीस आहे, ह्या करितां तिला तूं परकर शिवूनदे; कांचोळी मी आपल्या जवळची देते. तिला कांही द्यावयास नेल्यावांचन त्वांतिजकडे जाऊंनये, असें मी ह्मणते. मनी- आई, तूं ह्मणतेस ते खरेच आहे; पण मला वाटते की कांचोळी इतक्यांत बोलता बोलतां तया- र होईल. जना- मुलीं, ह्या कामाचा विचार अगोदर कर, तुला ठावके आहे की तुझी भावशी व भावजय मागला प्रहर दिवस राहतां तिकडे जाणार आहेत ९ तुझा जर परकर झाला नाही तर तुला काही त्या आ- पल्या बरोबर नेणार नाहीत. SHRNAL मनी- त्या काही प्रहर दिवस राहतां जाणार नाहीत, चार घटका दिवस राहतां जातलि. जना०- काय पोर इजतखोर पहा! अगे मी इतका जीव तोडून तुला सांगते तरी तं आपले सोडीत नाहीस; हा तुझा वाईट स्वभाव कधी जाईल आणि कधी शुद्धीवर येशील, बाई १ मनी- पण, त्या केव्हां जाणार हे मला जर खचीत